Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

ऐसि जरि देसिल भाख ।। तरि वारेन तुजसिं देख ॥
येरु तत्काळ देता झाला तये प्रत ।। बेत्याळिस सत्यवाचा ।। २६७ ॥
ऐसे जालें सत्यवचन ।। तंव सूर्योदय जाला जाण ।।
मग ते आणिलि नगरा लागुन ।। मनोहरा राक्षेसी ॥ २६८ ॥
असो ते मनोहरा ।। प्रशवलि अमित्य कुमारा ।।
शेषवंशि नृपवरा ॥ जे क्षेत्रि दारुण ।। २६९ ।।
ते मनोहरा सिंधाळदेशिची ।। तेथोनि नाम सिंधे शेषवंशी ॥
तें चालत आलें भुमंडळासी ।। सिंधे म्हणोनी ।। २७० ॥
या नंतरे अवधारा ॥ शकाधिकारि शालिवान जन्मला ॥
शेष ब्रह्मकुमरिसी रातला ।। भविष्य चरित्र ।। २७१ ।।
ते राहिला कुंभार शाळेसी ।। म्हणोन शाळिवान नाम तयासीं ।।
गोत्र वछ महाऋषी ।। कुळदेवता येकविरा ॥ २७२ ॥
पैठणी जाला उत्पन्न ॥ मृतिका अव्हानिली संपूर्ण ॥
दळ वारु हस्ति दारुण ॥ असंख्य केले ॥ २७३ ।।
तें कळलें विक्रमासीं ॥ तेणें वेताळ पाठविला हेरेसी ।।
तों फिरत आला पैठणासी ॥ तेथे तयासिं देखिलें ।। २७४ ।।
विचार पाहतां मानशी ।। शकाधिकारि जाला परियेसी ।।
चरित्र देखिलें नयनासी ॥ मग तेथोनि मुरडला ।। २७५ ॥
गेला उज्जनि-नगरी ॥ म्हणे विक्रमादित्यासि अवधारी ।।
कथा सांगितलि सविस्तरी ।। शाळिवानाची ॥ २७६ ॥
ऐकोन राजा सिद्ध जाला ॥ आपुले दळेसिं चालिला ॥
नदिपैलपारि राहिला । मग पाठविला शिष्ट ॥ २७७ ।।
येवोन शाळिवाना जाणविलें ।। युद्धासि चालावें वहिले ।।
ऐकोनि निरोप दिधले ॥ शाळिवाने ।। २७८ ।।
मग स्मरिला सहश्रफणी ॥ त्याणे नवनाग पाठविले तेथोनी ।।
अमृतकुपिका घेवोंनी ।। शाळिवाना जवळ आले ॥ २७९ ॥