Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

तंव त्या महावना माझारी ।। राजा देववीर राहिला अवधारी ॥
त माध्यानरात्रिचे अवसरी ।। आलि राक्षेसिणी आईका ।। २५३ ॥
महाविक्राळ सोंग ।। बाबरझोंटि उघडे आंग ।।
शब्द महाप्रचंड । केला तिणे ।। २५४ ॥
शरिर दिसे दुर्धर ।। घोर शब्दें गर्जलि निशाचर ।।
तें देखोन थोरथोर ।। वीर भयाभित पैं जाले ।। २५५ ।।
राजा देखोन तितें नयनी ।। क्रोधें खवळला महा अग्नी ।।
धनुष्य टणत्कारिलें संजोगोनी ॥ गुण चढविला ॥ २५६ ॥
गुणि लाविला बाण ।। करितां जाला संधान ।।
तंव ते बोलिली वचन ।। निशाचरी ॥ २५७ ॥
राया तुं कवण होसी । कवण देशिं नांदसी ।।
सत्य सांगे मजसी ।। नृपवरा ।। २५८ ।।
येरु बोलिला वचन ।। मी शेषवंशि निर्वाण ।।
तुं मज पुसावया कैचे ज्ञान ।। राक्षेसि म्हणोनी ।। २५९ ॥
येरि बोलिली उत्तर ।। मी सिंधाळनगरिची सुंदर ।।
जांघेळकुळि उत्पति साचार ।। मनोहर नाम माझें ॥ २६० ॥
मग ते राक्षेसी ।। मानववेश नटलि परियेसी ।।
जालि लावण्यरुप षोडशी ।। सकुमार अनुपम्ये ॥ २६१ ॥
तेजें जैसी विद्युल्लता ।। कोटि-दीनकर-प्रभा फांकता ॥
राजा जाला देखतां ॥ अति अपुर्व वर्तलें ।। २६२ ॥
ते महासुंदर राजसी ।। लावण्यरुपाचि रासी ।।
उपमा न ये देतां तयेसीं ।। माईक अनुपम्य ।। २६३ ॥
तिते देखोनि नृपवर ।। कामे विव्हळ देवदत्त वीर ।।
बोलता जाला प्रत्योत्तर ।। तिये प्रती ।। २६४ ॥
तुवां मोहिलें मजसी । आतां आईके विनतीसीं ॥
सर्वश्व देईन तुजसी ।। जरि वरिसी मज लागी ।। २६५ ॥
ईतुकें वचन ऐकुन ।। बोलति जालि मनोहरा आपण ॥
जरि राणियां भितरि वडिलपण ।। नुलंघसि वचन माझे पैं ॥ २६६ ॥