Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

                                                                                   लेखांक १६८

                                                                                                       श्री                                                     १६२० भाद्रपद शुध्द ७

                                                                                                              168


श्री सकलगुणमंडित अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य राजश्री विठल लक्षुमण देशाधिकारी व लेखकवर्तमानभावी सुभा प्रांत वाई गोसावीयाप्रती श्रीकराच्यार्य पडितराऊ असीर्वाद राजाभिषेक शक २५ बहुधान्य सवत्सरे भाद्रपद शुध्द सप्‍तमी गुरुवार कृष्णागिरी गोसावी याणे सातारेयाचे मुकामी येऊन विदित केले की आपला गुरु ह्मैसगिरी याचे मठ धाडेघर येथे आहे ते स्थली अती(त) अभ्यागत बहुत येताती त्यास अनउदक द्यावे लागते ह्मणून विदित केले त्यावरून मनास आणता गोसावी महत आहे ते स्थली अतीत बहुत येताती ह्मणून भूमि एकसर ता। हवेली प्रा। मजकूर येथे जिराईत जमीन अवल दूम सीम बिघे 68४ चार बिघे नेमून देविले असे यास सिसपरामपर सुरिक्षित चालवीत जाणे प्रतिवर्षी नूतन पत्राचे आक्षेप न करणे प्रती लिहोन घेऊन असल पत्र भोगवटीयास गोसावीयाचे स्वाधीन करणे जाणिजे छ ५ रबिलावल सु॥ तिसा तिसैन अलफ पा। हुजूर हे आसीर्वाद मोर्तब

                                                                                                                             168 1

बार सूद
छ १६ रबिलोव


                                                                

                                                                   

अधिक आषाढ वद्य ८ मंगळवारीं राजश्री दमाजी गायकवाड गुजराथप्रांतीहून पुणियास आला. त्याजला सामोरे श्रीमंत राजश्री नाना व भाऊ व दादा ऐसे संगमापावेतों जाऊन, भेटोन, त्याजला घेऊन येऊन, सयाजी गुजर याच्या वाडियांत राहावयास जागा दिल्ही. १

अधिक वद्य १० गुरुवारीं चांबळीचा महाजर, निम्मे पाटीलकीचा, सडेकरास करून दिल्हा. त्याजवरी शिक्के जाले. ऐशियास, पहिलेच, महजर लिहिला होता. त्याजवरी देशमुखाचा शिक्का होणें होता. तो देशमुखानीं करून मागेंच दिल्हा. जोडावर देखील शिक्के केले होते. राजमुद्रा पाहिजे. सरदेशमुखाचेंहि चिन्ह पाहिजे. त्यास सदो बयाजी याणीं दिकत घेतली कीं, सरदेशमुखाचें जालें नसतां, देशमुखानीं कां शिक्का केला ? हे दिकत घातली. राजमुद्रा हवालदाराची करावी. कर्हेपठारीं हवालदार नाहीं. हुजूरच श्रीपतराऊ बापूजी वोढितात. तेव्हां हवेली सांडसचे हवालदार तान्हाजी सोमनाथ याचा शिक्का करवूं लागले. त्याणीं दिकत घेतली कीं, जमीदारांनी आधीं शिक्के कां केले ? दुसरे जोडावर शिक्के कां केले ? याजमुळें दिकत घेतली. हकीमानीं दिकत घेतली, सरदेशमुखी ही हकीमाची. उपाय काय ? तेव्हां पाहिला महजर फिरविला. दुसरा केला. त्याजवरी एके बाजूनें काजीचें नांव घालून शिक्का केला. दुसरे बाजूस बाबाजीनें तान्हाजी सोमनाथ हवालदार व बापूजी रघुनाथ मजुमदार ता। हवेली सांडस ऐसें नांव लिहिलें. त्याजखालीं हवालदारांनी शिक्का केला. मोर्तब जोडावर केली. त्याजवर सदोबानीं सरदेशमुखीचे गुमास्ते सरदेशमुख प्रा। मारीं ह्मणून काजी खालीं एका बाजूस लिहिलें. त्याचे शेजारी शिदोजी नरसिंगराऊ व गोविंदराऊ शिताळे देशमुख प्रा। मार ह्मणून बहिरो कृष्ण धडफळे याणीं नांवें लेहून खाली वडिलेकडील शिक्का केला. पहिल्या कागदावरील देशमुखाचे शिक्के उतरले. सरदेशमुखाचें दस्तक नवेंच पाठी लाविलें. राज्याची सरदेशमुखी. उपाय नाहीं ! एक वेळ एके बाजूस सरदेशमुखाचे लिहीत. त्याखालीं एके बाजूस देशमुख. देशमुखाचे शेजारी, होनप देशपांडे ऐसें लिहित. एक वेळ देशमूख देशपांडियावर बीत सरदेशमूख ऐसेंहि लिहिले आहे. आजि तिन्ही शेजारीं लिहिलीं. शामराऊ व नारो आप्पाजी याणीं लेहविलीं. पहिलियाने सरदेशमुख, मध्ये देशमूख, शेवटी देशपांडे, ऐसें लिहिली आहेत. सरदेशमुख हकीम व हकीम ते हकीमच ! जे वेळेस जैसें लिहितील तैसें लिहिलें असे.

वद्य ११ शुक्रवारी

राजश्री नारो आप्पाजी याची                       राजश्री मोरो नरहर मेडजोगी
लेक भागी इजला बरें वाटत नव्हतें.             राजश्रीचे बक्षी योजला देवआज्ञा
ती रोजमजकुरी वारली. १                         जाली ह्मणून रोजमजकुरीं सावे
रोजीं खबर आली. सुतकासहि
                                                           सावा रोज.                       १

छ २५ साबान अधिक आषाढ वद्य १२ मंदवारीं राजश्री नाना पुरंधरे, महादोबा बाबाचे पुतणे, याची स्त्री सासवडीं वारली, ह्मणून छ २६ रोजीं वद्य १३ रविवारीं येथें खबर आली. कोनीं निघाली होती. पुत्र जाला आहे तो आहे. ती मात्र सा घटका रात्रीं मंदवारीं वारली. छ २६ रोज वद्य १३ रविवारी राजश्री मल्हारभट्ट बिन गोविंदभट्ट धर्माधिकारी याची स्त्री संध्याकाळचा चार घटका दिवस असतां वारली. तिजला बरें फार दिवस वाटत नव्हतें. पोटांत दुःख जालें होतें. त्याच दुःखानें वारली.

श्री.

स्मरण सन्न हजार ११६२, शके १६७४, अंगिरानाम संवछरे. जेष्ठमास.

जेष्ठ वद्य ९ मंगळवारी मातुश्री ताराऊसाहेब यानी धोंडो कृष्ण व माधवराऊ दि॥ राजश्री पंत प्रधान सातारियामधें जाऊन राजश्रीच्या चवकीस लोक होते त्याजला फितावून, पैका व कडीं देऊं करून, राजश्रीस काहाडून आणावें, ऐसा करार जाला. हे वर्तमान आईसाहेबास कळलियावर बातमी लावून उभयतां कारकूनास धरून, कैद करून, वर्तमान पुसिलें. त्यानीं सांगितले की, आपल्यास श्रीमंत राजश्री भीऊनीं या मजकूरावर पाठविले. राजश्री नानास कांहीं वर्तमान ठावकें नाहीं, ऐसें सांगितले. मग त्या कारकूनाबरोबर पंचवीस राऊत व हुजरे देउन येथे श्रीमंताकडे पा। कीं, हे कर्म तुमचीं आहेत, हे ब्राह्मण तुह्माकडे पाठविले आहेत, याजला काय शासन करणें असेल तें करा. ह्मणोन सांगेन पा।. त्यास, ते ब्राह्मण वोंकारेश्वराचे देवळीं राहिले. श्रीमंताची त्यांची भेट जाली नाहीं. रोजमजकुरी देवळींच होते. याप्रा। वर्तमान जालें ह्मणोन बोलतात. कोण्ही ह्मणतात खरें. कोण्ही ह्मणतात लटकें. याप्रा। आहे. खरे किंवा लटकें हें कांहीं कळेना.

जेष्ठ वद्य १३ मंदवारीं धोंडो कृष्ण व माधवराऊ हे श्रीवोंकारेश्वराचे देवळीं राहिले होते. त्यास देवळांत पाया पडावयास गेले. भोंवते ताराऊ साहेबाचे लोक होते. इतकियांत नजर चुकावून पळोन गेले. हें कांहीं ठिकाण लागलें नाही. हें वर्तमान श्रीमंतास कळलियावर श्रीमंतानीं राऊत व खासबारदार व बाणदार वगैरे लोक शोधास पा।. व गांवाभोंवताल्या चौकिया बसविल्या. बाहेरील माणूस आंत येई. परंतु गांवांतील बाहेर जाऊं न देत. याप्रा। संध्याकाळपावेतों जालें. संध्याकाळीं चौकी उठविली. ठिकाण लागलें नाहीं. याप्रा। वर्तमान जालें. १

जेष्ठ वद्य ३० सोमवारीं राजश्री अंताजीपंत फडणीस याजला सकाळच्या प्रहरा दिवसांत देवआज्ञा जाली. बरें कांहीं दिवस वाटत नव्हतें. प्रातःकाळीं तीन घटका दिवस आल्यानंतरी प्रतिपदेस वारले असेत.

अधिक आषाढ शुद्ध १५ सोमवार राजश्री राघो विनायक याजला पुत्र जाला होता. तो सावे रोजीं रोजमजकुरीं वारला, संध्याकाळीं.

छ ३० जाखिर जेष्ठ शुद्ध २ सोमवारी राजश्री नारो आप्पाजी पाडळीकर याच्या वडिल्या भावाची बाबाची लेक राजश्री बाबुराऊ दत्तो महाशब्दे याच्या पुत्रास दिल्ही. लग्न सतरा घटका रात्रीचें, मु॥ पुणे. तैसेंच राजश्री आप्पाजी मल्हार धडफळे यांनी आपल्या धोंडीचें लग्न रोजमजकुरींच केलें. शरीरसंबंध त्रिंबक गोपाळ दि॥ श्री याच्या भावास दिल्ही. याप्रों। रोजमजकुरी लग्नें जालीं. १

जेष्ठ शुद्ध ७ मंदवारीं नवदाहा घटका रात्र अवसीची जाली होती तेसमई खंडो विसाजी देशपांडे यास देवाआज्ञा जाली. दोन तीन महिने बरें वाटत नव्हतें.

जेष्ठ शुद्ध ९ रविवारी संध्याकाळी चार घटका रात्र जाली होती, ते समई राजश्री गोविंदराऊ बिन्न अडबोजीनाईक शितोळे देशमुख यांची धाकटी लेक उमर वरसें अकरा बाराची होती तिजला उमाबाई दाभाडियानीं येऊन साखरपुडा घातला. राजश्री सेनापतीस केली. लग्न शुद्ध ११ मंगळवारी तळेगांवीं जालें. नवरी तेथेंच नेली. मातुश्री लाडूबाई व देशमुख लग्नास गेले. शुद्ध १० सोमवारी.

जेष्ठ शुद्ध १० सोमवारी राजश्री शिदोजी नरसिंगराऊ शितोळे देशमुख याजला टिळा आणिला. मातुश्री उमाबाईनी आपल्या कारकुनाबरोबर पा।. त्याच्या कारकूनास तेच समईं वस्त्रें दिल्हीं. सकाळ्या दिढा प्रहरांत विध उरकला. १

जेष्ठ शुद्ध द्वादशी बुधवारीं. संध्याकाळचा तीन चार घटका दिवस होता तेसमई श्रीकेदारेश्वराच्या देवाल्याच्या शिकरावर वीज पडली. शिकर थोडेसें जाया जालें. चुनाहि थोडासा पडिला.

जेष्ठ शुद्ध १३ गुरुवारी श्रीमंतानी केसानदेस गाइनें वासरूं वितेसमईं खाल्ले होते, त्याचे शांतीला करावयास ब्राह्मण पाटविले.

जेष्ठ शुद्ध ४ बुधवारीं श्रीमंत राजश्री पंत प्रधान यांचे पुत्र विश्वासराऊ राजश्री जानाजी निंबाळकर याचेथें लग्नास गेले होते ते रोजमजकुरीं आले. १

शुद्ध १२ गुरुवारी राजश्री यमाजी शिवदेव याजला श्रीमंतांनी सातारियास मातुश्री ताराऊसाहेबकडे पा।. १

वैशाख शुद्ध ८ शुक्रवारीं संध्याकाळीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित श्रीबनेश्वरास गेले होते. ते रोजमजकुरीं आले. १

वैशाख शुद्ध ९ मंदवारी रात्री राजश्री बाळाजीपंत मांडवगणे याचे लेकीचें लग्न जालें. शरीरसंबंध राजश्री नारो रघुनाथ वैद्य यांच्या पुत्रास दिली. १

वैशाख शुद्ध ११ सोमवारी राजश्री सेनाखासखेल श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांचे भेटीस आले. त्याजला सामोरे राजश्री विश्वासराऊ व राजश्री त्रिंबकराऊ मामा ऐसे गेले होते. १

वैशाख शुद्ध १२ मंगळवारी मधरात्रीं राजश्री विश्वासराऊ, राजश्री जानोजी निंबाळकर यांच्या घरास लग्नास गेले. बरोबर मोरो बल्लाळ व ( पुढें कोरी जागा )

वैशाख शुद्ध १४ सह पूर्णीमा गुरुवारीं गणेशभट वेव्हारे याजला प्रथिकाळीं देवआज्ञा जाली. १

वैशाख वद्य ४ मंगळवार प्रधानपंत थेवरास गेले. मु॥ केला. दुसरे रोजीं येतेसमई कोलवडीस कृष्णाजीपंताचे घरी जाऊन वस्त्रें घेऊन सा घटका रात्री घरास आले. १

वद्य षष्ठी गुरुवारी, राजश्री गोविंदराऊ बिन्न अडबोजी नाईक शितोळे देशमूख यानीं आपली लेक तान्हाजी धायबर याजला दिल्ही. तिची मागणी रोजमजकुरी घातली. १

छ १३ जाखर वैशाख शुद्ध १५ शुक्रवारी खबर आली की, राजश्री रामदासपंत मोंगलाचा दिवाण याजला, जमातदाराची तबल चहडली ते मागावयास गेला, आहे नाहीं ह्मटलें ह्मणून त्यानें त्याजला मारिलें. ऐशी खबर आली. छ १८ जा। खरी वैशाख वद्य ५ बुधवारी पुणियास खबर आली.

वैशाख वद्य ६ गुरुवारी सुभानजी बिन्न अप्पाजी जाधव याचे कन्येचें बाळीबाईचें लग्न गोरख जालें. शरीरसंबंध राजश्री तुकोजी पवार यासी केला. श्रीमंत राजश्री पंतप्रधान व राजश्री भाऊ व राजश्री दादा व सर्व बायकामुले लग्नास आणिली. समारंभ उत्तम प्रकारें केला. श्रीमंतास दोन घोडीं व एक हत्ती नजर केली. वस्त्रें त्याच्याबरोबरील सर्वा लोकांस दिल्हीं. द्वादशीस भोजनोत्तर श्रीमंत माघारे गेले. १

                                                                                   लेखांक १६७

                                                                                                श्रीरामसमर्थ                                                     १६१९ कार्तिक वद्य ७

अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य राजश्री अनाजी जनार्दन देशाधिकारी व देशलेखक प्रा। वाई गोसावी यासि

सेवक शंकराजी नारायण सचीव नमस्कार सु॥ समान तिसैन अलफ मौजे इडमिडे संमत निंब प्रा। मा।र हा गाव भवानगीर गोसावी यास इनाम सर्वमान्य दिल्हा आहे ऐसीयास मौजे मा।री सरदेशमुखी व देशमुखी व सरदेशकुलकर्ण व बाजे वतन एकदर गोसावी याचे गावी उसूल न घ्यावा येविशीं छत्रपती स्वामीनी कमाविसदारास आज्ञापत्र सादर केले आहे तर मौजे मजकुरावर सरदेशकुलकर्णाचा हकाचा रोखा तुह्मी एकदर न करणे मौजे मजकूर गोसावीयाकडे आहे तेथील बोभाट हुजूर येऊ न देणे जाणिजे छ २० रबिलाखर संदेश समक्ष

                                                                                                                             167

सुरू सूद


                                                                

                                                                   

शके १६७४     प्रजापतिनामसंवछरे चैत्र शुद्ध.

चैत्र शुद्ध ४ रविवारीं मोरो खंडेराऊ देशपांडे, प्रा। पुणें, यांची सून लवळेकर यांची लेक इजला लवळियांमध्ये फोड्या निघोन रोजमजकुरीं देवआज्ञा जाली, दुसरे दिवशीं देशपांडियास वर्तमान कळलें, तेव्हां सुतक पडिलें. परंतु ब्राह्मणभोजन व कथा करीत असेत. आगांतुक ब्राह्मण भोजनास जात असेत. ग्रामस्त, मातबर ब्राह्मण कोन्ही भोजनास गेले नाहींत, याप्रा। केलें.

चैत्र शुद्ध १५ बुधवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान व राजश्री सदाशिवपंतभाऊ ऐसें विसा घटका दिवसाउपरांतिक पुणियास आले. विसापूर व लोहगड पाहून मग आले.

चैत्र वद्य तृतिया मंदवासरे ते दिवशीं प्राथकाळचा घटकाभर दिवस आला ते समई चिरंजीव सोभाग्यवती ठमाबाई प्रसूत जाली. कन्या जाली. तिचें नांव ताराई. स्वातीनक्षत्र, चरण चौथा, र्हुदयीं नक्षत्र पडिलें आहे.

चैत्र वद्य १ सोमवार ते दिवशीं राजश्री आबाजी चिंतामण हुडपसरकर कुलकर्णी याचे हवाला कागद, त्यानीं मिरासशेत मौजे हड़पसर येथे करून घेतलें आहे, त्याचा चकनामा ठेवावयास दिल्हा होता तो मागोव्यास आले. तो त्याचे हवाली केला, गु॥ आकोपंत पिंपळगांवकर कुलकर्णी.

चैत्र वद्य षष्ठी मंगळवारी राजश्री साबाजी नाईक निंबाळकर याजला मेजमानी मातुश्री लाडूबाई देशमुख यानी केली. कारकून आपल्या घरास भोजनास आले. याप्रा। केली. वस्त्रेंहि अगत्याअगत्य दिल्हीं. १

चैत्र वद्य आमावाशेस राजश्री खंडेराऊ निंबाळकर याजला मातुश्री लाडूबाई देशमुख यानीं मेजमानी केली. १

वैशाख शुद्ध द्वितिया रविवारी संध्याकाळी चार घटका दिवस असतां श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान व राजश्री भाऊ ऐसे उभयतां मातुश्री उमाबाई व अंबिकाबाई दाभाडी याजकड़े आवजी कवाडयाच्या वाडियांत आले. दोनेक घटका होते. उपरांतिक गेले. काय मसलतीस गेले होते हें कळेना. १

फाल्गुन मास.

शुद्ध ५ रविवारी चिरंजीव राजश्री लक्षुमणराऊ याचा पुत्र सखाराम याचे वृतबंधाचे लग्न प्रातःकाळच्या (कोरे ) घटकांत लागलें. १

शुद्ध ७ मंगळवारी संध्याकाळीं नरहर खंडेराऊ होनप देशपांडे याज़ला बरें वाटत नव्हतें आणि रोजमजकुरीं मूतहि गुंतलें होतें तें खलास जालें, आणि मग देवआज्ञा जाली.

शुद्ध ११ शुक्रवारीं.

राजश्री बाळाजी पंडित प्रधान                               मातुश्री उमाबाई दाभाडी व
यांच्या दुसर्या पुत्राचें वृतबंध                                 अंबिकाबाई सिंहीगड़वर श्रीमंतांनी
प लग्न जालें. देवकप्रतिष्ठा                                    ठेविली होती. ते रोजमजकुरीं
विश्वासराऊ यांनी केली. श्रीमंत                             जाऊन, गडावरून घेऊन, पुणियास
गंगातीरीं मोंगलाच्या मागें होते.                             आणिली. आणि आवजी कवड़े
मुंजीस खर्चवेंच मध्यमच केला.                             याच्या वाड़ियांत ठेविली.
ब्राह्मणभोजनहि फारसें केलें नाहीं.

फाल्गुन शुद्ध नवमी बुधवारी राजश्री शिदोजी नरसिंगराऊ देशमुख याजला नवरी अमृतराऊ निंबाळकर याची कन्या पाहिली. तिजला साखरपुडा रोजमजकुरी अवाळुजेस घातला. १

फाल्गुन वद्य ४ मंदवारीं संध्याकाळी विठ्ठल मल्हार धडफळे याचा पुत्र साडेपांचावरसाचा होता. त्याजला देवी निघोन वारला. मुंज जाली नव्हती. १

मार्गेश्वर शुद्ध दशमी रविवारी राजश्री सेनापति व सेनाखासखेल ऐसे सणवारचे रात्रीं पळाले. कोन्हीकडे गेले हें कळलें नाहीं. १

रोजमजकुरीं सोभाग्यवती गोपिकाबाई श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांची स्त्री श्रीमंताकडे लश्करास गेली. वरकड बायका कांहीं पुरंधरास गेलिया. पेशवियाची वस्तभाव सिंहगड व पुरंधर येथें गेली. वस्तभाऊ गडोगड पळविली. १

शुद्ध १२ सह १३ मंगळवारी राणचा वाघ पुणियांत गांवांत आला. नथुगौडा याच्या घरांत लपाला. एक दोन माणसें जाया थोडींबहुत केलीं. मग मारिला. खड्या होता. रोजमजकुरी लोकें पार पळोन गेलीं. १

मार्गेश्वर शुद्ध १४ बुधवारीं श्रीमंतांनी मोंगलाशीं थोडीबहुत लढाई केली. चिमणाजीबापू शेणवाई ठार पडले. मसणाजी जगताप राजे वडिकर, सटवोजी जाधवाकडील, मोंगलाच्या फौजेंत घोडा पडोन सांपडला. समशेरबाहादूर यांच्या घोडीस भालियाची जखम लागली. पारनेरानजीक जुंझ जालें. १

शुद्ध १५ पुर्णमेस दिवसा झटापट जाली. रात्रीं ग्रहण लागतेसमई मोंगलाकडील छापा, श्रीमंत नानास स्नानास गेले तेथें, आला. गारदी व फिरंगियानी दारूगोळी, बाण यांचा मार फार दिधला. हे उधळीन निघाले तेसमई तारंबळ जाली. माणूस जाया जालें नाहीं. दुरून
आरब सुटला. जवळ मिळाले नव्हते. त्याजमुळें खंड जाली.

वद्य ६ बुधवारीं मलठणच्या मुक्कामावर श्रीमंताचें व मोंगलाचें जुंझ भारी जालें. नंदुरबारचा मोंगल पछाडीस होता. रहदारीने चालतां मधे खिंड पडली. तिजवर घालवून सारा लुटला. चार हत्ती आणले, व पांच सातशें घोडे आणिले. लोकहि मारिले. ते समई खंडोजी निगडे याजला जखम लागेन ठार पडिले. १
माघ शुद्ध १२ शुक्रवारीं येशबंतराऊ बिन्न गोविंदराऊ शितोळे देशमुख प्रा पुणें यास देवआज्ञा जाली. त्याची क्रिया त्रिंबकराऊ बिन्न बाबूराऊ देशमुख यानीं केली. १

माघ वद्य ११ शुक्रवारीं खंडो रघुनाथ यांची स्त्री सखूबाई यास देवआज्ञा जाली.

राजश्री आप्पाजी मल्हार धडफळे यांचा पुत्र पाहिला दादू याचें लग्न चिंचवाडो फाल्गुन वद्य ११ मंदवारीं जालें. शरीरसंबंध राजश्री कोनेर त्रिंबक एकबोटे यास केला. त्याची कन्या दुसरी.

                                                                                   लेखांक १६६

                                                                                                श्रीरामसमर्थ                                                     १६१९ कार्तिक शुध्द १२

मा। वरातदार मौजे इडमिडे यासि अनाजी जनार्दन सुभेदार व कारकून प्रात वाई सु॥ समान तिसैन अलफ मोजे मजकूर रा। भवानगीर गोसावी यासि इनाम राजश्री पत उभयता यानी दिल्हा आहे तेथील वराता देखील हकदार होतील त्या कुल मना हुजरून करविल्या आहेत त्यावरून तुह्मास रोखा सादर केले असे तरी मौजे मजकुरास उपद्रव न देणे उठोन जाणे गावीचे वाटे जाल आणि गोसावी याचा बोभाट आला म्हणजे आह्मास बोल नाही छ १० रा।खर

                                                                                                                             166