लेखांक १६८
श्री १६२० भाद्रपद शुध्द ७
श्री सकलगुणमंडित अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य राजश्री विठल लक्षुमण देशाधिकारी व लेखकवर्तमानभावी सुभा प्रांत वाई गोसावीयाप्रती श्रीकराच्यार्य पडितराऊ असीर्वाद राजाभिषेक शक २५ बहुधान्य सवत्सरे भाद्रपद शुध्द सप्तमी गुरुवार कृष्णागिरी गोसावी याणे सातारेयाचे मुकामी येऊन विदित केले की आपला गुरु ह्मैसगिरी याचे मठ धाडेघर येथे आहे ते स्थली अती(त) अभ्यागत बहुत येताती त्यास अनउदक द्यावे लागते ह्मणून विदित केले त्यावरून मनास आणता गोसावी महत आहे ते स्थली अतीत बहुत येताती ह्मणून भूमि एकसर ता। हवेली प्रा। मजकूर येथे जिराईत जमीन अवल दूम सीम बिघे ४ चार बिघे नेमून देविले असे यास सिसपरामपर सुरिक्षित चालवीत जाणे प्रतिवर्षी नूतन पत्राचे आक्षेप न करणे प्रती लिहोन घेऊन असल पत्र भोगवटीयास गोसावीयाचे स्वाधीन करणे जाणिजे छ ५ रबिलावल सु॥ तिसा तिसैन अलफ पा। हुजूर हे आसीर्वाद मोर्तब
बार सूद
छ १६ रबिलोव