लेखांक १६७
श्रीरामसमर्थ १६१९ कार्तिक वद्य ७
अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य राजश्री अनाजी जनार्दन देशाधिकारी व देशलेखक प्रा। वाई गोसावी यासि
सेवक शंकराजी नारायण सचीव नमस्कार सु॥ समान तिसैन अलफ मौजे इडमिडे संमत निंब प्रा। मा।र हा गाव भवानगीर गोसावी यास इनाम सर्वमान्य दिल्हा आहे ऐसीयास मौजे मा।री सरदेशमुखी व देशमुखी व सरदेशकुलकर्ण व बाजे वतन एकदर गोसावी याचे गावी उसूल न घ्यावा येविशीं छत्रपती स्वामीनी कमाविसदारास आज्ञापत्र सादर केले आहे तर मौजे मजकुरावर सरदेशकुलकर्णाचा हकाचा रोखा तुह्मी एकदर न करणे मौजे मजकूर गोसावीयाकडे आहे तेथील बोभाट हुजूर येऊ न देणे जाणिजे छ २० रबिलाखर संदेश समक्ष
सुरू सूद