फाल्गुन मास.
शुद्ध ५ रविवारी चिरंजीव राजश्री लक्षुमणराऊ याचा पुत्र सखाराम याचे वृतबंधाचे लग्न प्रातःकाळच्या (कोरे ) घटकांत लागलें. १
शुद्ध ७ मंगळवारी संध्याकाळीं नरहर खंडेराऊ होनप देशपांडे याज़ला बरें वाटत नव्हतें आणि रोजमजकुरीं मूतहि गुंतलें होतें तें खलास जालें, आणि मग देवआज्ञा जाली.
शुद्ध ११ शुक्रवारीं.
राजश्री बाळाजी पंडित प्रधान मातुश्री उमाबाई दाभाडी व
यांच्या दुसर्या पुत्राचें वृतबंध अंबिकाबाई सिंहीगड़वर श्रीमंतांनी
प लग्न जालें. देवकप्रतिष्ठा ठेविली होती. ते रोजमजकुरीं
विश्वासराऊ यांनी केली. श्रीमंत जाऊन, गडावरून घेऊन, पुणियास
गंगातीरीं मोंगलाच्या मागें होते. आणिली. आणि आवजी कवड़े
मुंजीस खर्चवेंच मध्यमच केला. याच्या वाड़ियांत ठेविली.
ब्राह्मणभोजनहि फारसें केलें नाहीं.
फाल्गुन शुद्ध नवमी बुधवारी राजश्री शिदोजी नरसिंगराऊ देशमुख याजला नवरी अमृतराऊ निंबाळकर याची कन्या पाहिली. तिजला साखरपुडा रोजमजकुरी अवाळुजेस घातला. १
फाल्गुन वद्य ४ मंदवारीं संध्याकाळी विठ्ठल मल्हार धडफळे याचा पुत्र साडेपांचावरसाचा होता. त्याजला देवी निघोन वारला. मुंज जाली नव्हती. १