अधिक आषाढ वद्य ८ मंगळवारीं राजश्री दमाजी गायकवाड गुजराथप्रांतीहून पुणियास आला. त्याजला सामोरे श्रीमंत राजश्री नाना व भाऊ व दादा ऐसे संगमापावेतों जाऊन, भेटोन, त्याजला घेऊन येऊन, सयाजी गुजर याच्या वाडियांत राहावयास जागा दिल्ही. १
अधिक वद्य १० गुरुवारीं चांबळीचा महाजर, निम्मे पाटीलकीचा, सडेकरास करून दिल्हा. त्याजवरी शिक्के जाले. ऐशियास, पहिलेच, महजर लिहिला होता. त्याजवरी देशमुखाचा शिक्का होणें होता. तो देशमुखानीं करून मागेंच दिल्हा. जोडावर देखील शिक्के केले होते. राजमुद्रा पाहिजे. सरदेशमुखाचेंहि चिन्ह पाहिजे. त्यास सदो बयाजी याणीं दिकत घेतली कीं, सरदेशमुखाचें जालें नसतां, देशमुखानीं कां शिक्का केला ? हे दिकत घातली. राजमुद्रा हवालदाराची करावी. कर्हेपठारीं हवालदार नाहीं. हुजूरच श्रीपतराऊ बापूजी वोढितात. तेव्हां हवेली सांडसचे हवालदार तान्हाजी सोमनाथ याचा शिक्का करवूं लागले. त्याणीं दिकत घेतली कीं, जमीदारांनी आधीं शिक्के कां केले ? दुसरे जोडावर शिक्के कां केले ? याजमुळें दिकत घेतली. हकीमानीं दिकत घेतली, सरदेशमुखी ही हकीमाची. उपाय काय ? तेव्हां पाहिला महजर फिरविला. दुसरा केला. त्याजवरी एके बाजूनें काजीचें नांव घालून शिक्का केला. दुसरे बाजूस बाबाजीनें तान्हाजी सोमनाथ हवालदार व बापूजी रघुनाथ मजुमदार ता। हवेली सांडस ऐसें नांव लिहिलें. त्याजखालीं हवालदारांनी शिक्का केला. मोर्तब जोडावर केली. त्याजवर सदोबानीं सरदेशमुखीचे गुमास्ते सरदेशमुख प्रा। मारीं ह्मणून काजी खालीं एका बाजूस लिहिलें. त्याचे शेजारी शिदोजी नरसिंगराऊ व गोविंदराऊ शिताळे देशमुख प्रा। मार ह्मणून बहिरो कृष्ण धडफळे याणीं नांवें लेहून खाली वडिलेकडील शिक्का केला. पहिल्या कागदावरील देशमुखाचे शिक्के उतरले. सरदेशमुखाचें दस्तक नवेंच पाठी लाविलें. राज्याची सरदेशमुखी. उपाय नाहीं ! एक वेळ एके बाजूस सरदेशमुखाचे लिहीत. त्याखालीं एके बाजूस देशमुख. देशमुखाचे शेजारी, होनप देशपांडे ऐसें लिहित. एक वेळ देशमूख देशपांडियावर बीत सरदेशमूख ऐसेंहि लिहिले आहे. आजि तिन्ही शेजारीं लिहिलीं. शामराऊ व नारो आप्पाजी याणीं लेहविलीं. पहिलियाने सरदेशमुख, मध्ये देशमूख, शेवटी देशपांडे, ऐसें लिहिली आहेत. सरदेशमुख हकीम व हकीम ते हकीमच ! जे वेळेस जैसें लिहितील तैसें लिहिलें असे.
वद्य ११ शुक्रवारी
राजश्री नारो आप्पाजी याची राजश्री मोरो नरहर मेडजोगी
लेक भागी इजला बरें वाटत नव्हतें. राजश्रीचे बक्षी योजला देवआज्ञा
ती रोजमजकुरी वारली. १ जाली ह्मणून रोजमजकुरीं सावे
रोजीं खबर आली. सुतकासहि
सावा रोज. १
छ २५ साबान अधिक आषाढ वद्य १२ मंदवारीं राजश्री नाना पुरंधरे, महादोबा बाबाचे पुतणे, याची स्त्री सासवडीं वारली, ह्मणून छ २६ रोजीं वद्य १३ रविवारीं येथें खबर आली. कोनीं निघाली होती. पुत्र जाला आहे तो आहे. ती मात्र सा घटका रात्रीं मंदवारीं वारली. छ २६ रोज वद्य १३ रविवारी राजश्री मल्हारभट्ट बिन गोविंदभट्ट धर्माधिकारी याची स्त्री संध्याकाळचा चार घटका दिवस असतां वारली. तिजला बरें फार दिवस वाटत नव्हतें. पोटांत दुःख जालें होतें. त्याच दुःखानें वारली.