Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१२
श्री १६३० आषाढ वद्य ६
सदानंद
राजमान्य राजश्री नारो पिलाजी दि॥ साहोत्रा प्रा। वाई यासि
सेवक नारो शकर सचीव नमस्कार सु॥ तिसा मया अलफ मौजे इडमिडे सा। निं हा गाव राजश्री याकडे इनाम आहे त्यास तेथील साहोत्रीयाचा ऐवज तीर्थरूप राजश्री पंताजी गोसावी याकडे देविला आहे ह्मणून गोसावी यानी विदित केले ऐशास पाहिले तीर्थरूप राजश्री पताची सनद तुह्मास असिली तरी मौजे मा।रास साहोत्रीयाचा तगादा न लावणे सनदेप्रमाणे पुढे चालवणे छ २९ रबिलाखर जरी पहिली सनद असिली तरी हाली रोखा केला आहे तो मना करणे
सुरुसूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ११५ ]
श्री. शके १६५९ भाद्रपद वा। ३०.
राजश्री गंगाजी नाईक अणजोरकर व शिवजी ना। अणजोरकर यांसः- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ समान सलासीन मया अलफ. सांप्रत वसईवरी हल्ला जाहली. तेसमई कार्य न जाहालें ह्मणून तुह्मीं कांहीं मनांत दिलगीर न होणें. शाबास तुमची कीं तुह्मीं मन वाढवून मेहनत उत्तम प्रकारें केली ! ज्यांणीं साहेबकामाच्याठाईं मन वाढवून कामकाज केलें आहे, त्यांचें सर्व प्रकारें ऊर्जित केलें जाईल; व कोण्ही साहेब कामावर ठार जाला असेल, त्याचे मागें मुलामाणसाचें चालविलें जाईल. कार्य आजी न जाहालें, तरी पुढें तुमचे हातून घेतलें जाईलं. तुह्मीं आपलें समाधान असों देणें. जाणिजे. छ. २८ जमादिलवल. बहुत काय लिहिणे ?
लेखन
सीमा.
० श्री ॅ
शाहू नरपति
हर्षनिधान बा-
जीराव बल्लाळ
प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ११४ ]
श्री. शके १६५९ भाद्रपद बा। ३०.
रा। शिवजी नाईक अणजूरकर गो॥
स्नो। चिमणाजी बल्लाळ. सु॥ समान सलासीन मया अलफ. वसईवरी हल्ला जाहाली ते प्रसंगी तुह्मीं मनें वाढवून मेहनत केली ह्मणोन विदित जाहालें. तर तुह्मी मर्द आहां ! जे लोक जे साहेबकामाविशीं मनें वाढवितील त्यांचे ऊर्जित होईल. जे ठार जाहाले आहेत, त्यांच्या मुलामाणसांचें चालविलें जाईल. जखमी जाले असतील त्यांची निगा करून बरें करणें. लोकांचे दिलासे करणें. जाणिजे. छ. २८ जमादिलावल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २११
श्री १६३० चैत्र शुध्द ४
तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वधारीनाम सवत्सरे चैत्र शुध चतुर्थी इदुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शाहु छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमानभावी प्रात वाई यासी (शिक्का) आज्ञा केली ऐसी जे भवानगीर गोसावी वास्तव कसबे निंब प्रात मा।र याणीं हुजूर येऊन विदित केले कीं श्री सदानद जागृत स्थल मठ कसबेमजकुरी आहे तेथे अन्नछत्राबद्दल राजश्री राजाराम कैलासवासी स्वामीनी गबाबवगना इनामभूमि दिल्ही आहे चावर १ एक ता। कसबे निंब चावर ॥ मौजे गोवो सा। निंब चावर ॥ येणेबप्रो। एक चावर इनाम चालत आहे तेणेप्रो। स्वामीनी चालविले पाहिजे म्हणोन विनती केली त्या(व)रून मनास आणिता श्रीसदानद गोसावी जाग्रत स्थल तेथे अन्नछत्र चालिले पाहिजे याकरिता पेशजीप्रो एक चावर जमीन सदरहू करार करून तुह्मास हे आज्ञापत्र सादर केले तरी सदरहू एक चावर जमीन पेशजी इनाम चालिला असेल तेणेप्रो। चालवीत जाणे नवीन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहोन घेऊन मुख्य पत्र भोगवटीयाद्दल गोसावीयाजवळ देणे निदेश समक्ष मोर्तब
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ११३ ]
श्री. शके १६५९ भाद्रपद शुद्ध ९. मा। अनाम देशमुख व मुकदम व देशपांडे का सासवड यांसिः--
बाजीराऊ बल्लाळ प्रधान. सु॥ समान सलासैन मया व अलफ. सावजी झेंडे, व रुपाजी झेंडे, व कृष्णाजी झेंडे, व सुलबाजी झेंडे, मौजे दिये, का। मजकूर, यांणीं हुजूर येऊन विदित केलें कीं, आपली आजी पूर्वी हिवरकराची लेंक; कामथियास दिल्ही होती. तिचा दादला मयत जालियावर, आपली आजी, पिलाजी पाटील झेंडे, मौजे मजकूर, यापाशी होती. मुहूर्त लागेन वर्तवावी, ऐसा निश्चये असतां काळ पडोन परागंदा होत फिरणें लागलें. त्यामुळें आपला बाप-जावजी–झेंडा–तिचे पोटीं मुहूर्त न लागतां निर्माण जाहाला. पुढें गोतपत करून गोतांत घ्यावे, तों दुष्काळ पडला. यामुळें गोतपत राहिली. सांप्रत, गोतास शरण जाऊन, जाली हकीकत गोतास सांगितली. त्यास, विपरीत काळामुळें ऐसे प्रसंग कित्येक बनतात. त्यास, सरकारची आज्ञा जालिया गोतांत घेऊन पावन करूं, ऐसें गोतानें ह्मटलें आहे. तरी साहेबीं कृपा करून गोतपत करावयाची आज्ञा जाहाली पाहिजे, ह्मणोन. त्यावरून मनास आणितां, ऐसे प्रसंग शूद्र लोकांत होऊन गोतपती जालिया आहेत. तदनरूप याची व्हावी, उचित जाणोन हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं तुळापुरीं श्रीभीमासंन्निध जाऊन, या चतुरवर्गाचें कन्यासंतान खेरीजकरून, पुत्रसंतान यांच्या स्त्रियांसहित गोतांत घेऊन, याच्या वंशपरंपरेनें अन्नवेव्हार व शरीरसंबंध होऊन गोतांत वर्तत, ऐसें करणें. जाणिजे. छ. ७ जमादिलोवल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरप-
ति हर्षनिधान बाजी-
राव बल्लाळ प्रधान.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ११२ ]
श्रीदत्तात्रेय. शके १६५९ भाद्रपद शुद्ध ९.
० श्री ॅ
राजा शाहू छत्र-
पति स्वमिचरणि त-
त्पर देवराव मेघ-
शाम निरंतर.
देशमुख व मेकादम मा। अनाम व देशपांडे का। सासवड:-
देवराउ मेघशाम सु॥सन समान सलासैन मया अलफ. तुह्मी करार करून गेलेत कीं, जाताच करारप्रों। ऐवज वसूल करून पाठवितों. त्यास अद्याप ऐवजे येऊन पोंहचत नाहीं. यावरून काय ह्मणावें ? हाल्ली देखत आज्ञापत्र जे बाकी असेल ते झाडियानशीं पाठवून देणें. उजूर केलिया कार्यास येणार नाहीं. राजश्री लक्ष्मण माणकेश्वर कमाविसदार का। मजकूर याचे रजेतलबेत वर्तत जाणें. जाणिजे. रा। छ० ७ जमादिलोवल. या कामास नरसोजी जाधव पा। आहे. यास मसाला रुपये पांच देणें. जाणिजे. छ. मजकूर.
लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१०
श्री १६२९ माघ वद्य ९
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजित सवत्सरे माघ बहुल नवमी भौमवासरे क्षत्रियकुलवतस श्री राजा शाहु छत्रपती स्वामी यानी देशाधिकारी व कारकून वर्तमानभावी सुभा प्रात जाउली यास आज्ञा केली ऐसी जे कृष्णगिरी गोसावी ह्मैसगिरी गोसावी याचे शिष्य वस्ती मौजे धाडेघर ता। बारामुरे हुजूर येऊनु विदित केले कीं आपले गुरु यासि थोरले राजश्री कैलासवासी स्वामी यानी तादुळ कोठी मापे मण पाच धर्मादाय दिल्हा होता तो चालत होता त्यावरी ह्मैसगिरी यानी समाधी घेतली आपण मठी वास्तव्य करून आहो त्यावर आपण राजश्री शिवाजी राजे याजवळी जाऊनु पूर्वील वर्तमान विदित करून पाहिले प्रो। पाच । मणाची धर्मादायाची सनद घेतली आहे तेणेप्रमाणे चालत आले आहे तर महाराजेही चालविले पाहिजे ह्मणऊनु विनति केली त्यावरून चिरजीव राजश्री शिवाजी राजे याचे पत्र आणून पाहोनु तेणेप्रमाणे गोसावी याचा धर्मादाय तादूळ कोठी मापे मण .।. पाचा करार करून तुह्मास आज्ञा केली असे तर तुह्मी सालगु॥ता। चालत आले असेली तेणेप्रमाणे गोसावी जोवर वर्तमान असेली तोवर चालवीत जाणे प्रतिवरशी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती घेउनु असल पत्र भोगवटीयासी गोसावी यापाशी फिराऊनु देणे
तेरीख २१ जिल्काद सु॥ समान मया अलफ
बार सुरुसुद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०९
श्रीशंकर १६२९ माघ शुध्द १
सदानंदस्वामी
राजश्री सुभेदार व कारकून मा। सरदेशमुखी
प्रा। वाई गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। हिंदुराव घोरपडे सरदेशमुख दडवत सु॥ समान मया अलफ मौजे इरमडे सा। निंब हा गाव गोसावी यास इनाम आहे तेथील सरदेशमुखी हिजा ऐवज जो आकारेल तो त्याचे दुमाला करणे गावास उपसर्ग एकंदर न देणे जाणिजे छ २९ शौवाल
बारसुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ १११ ]
नक्कल.
श्री. शके १६५९ चैत्र शु॥ ८.
यादि चिटणीसांची कैद पूर्वीपासोन चालत आहे, त्याप्रमाणें, चालवण्याविसींची कलमबंदी सु॥ सबसलासीन मया व अलफ छ. ७ जिल्हेज.
इनाम गांव कोणांस दिल्हा तहनामा चिटणिसी कलम १
तरि त्याचीं पत्रें जिनसास निरख करून देणें, तरि
२ फडनिसी चिटणिसी. कलम. १
१ वतनपत्र नांवाचें मुलकास इस्ताबियाचा कौल देणें
१ मोकदमाचें तो चिटणिसी, आणि खंडणी करून
----- करार ठरेल त्याचा कौल फडनिसी.
२ नवा आमलदार जाला तरि
३ चिटणिसी त्याचे नांवाची सनद मात्र
१ जिह्मेदारास फडनिसी, वरकड पत्रें
१ सुभेदारास चिटनिसी कलम
१ देशमुख देशपांडे १
----- घांसदाण्याचे रोख होणें, ते
३ चिटनिसी कलम
एकूण कलम १
१ रसद व इरसाल लग्नकार्य वगैरे
मोकासे गांव दिल्हे त्याची सामान आणावयाचीं पत्रें चिट-
१ मोकासदमास निसी. यांजमध्यें रसद याबद्दल
३ चिटनिसी पैका उगवून घेणें, त्याची सनद
१ जिह्मेदारास सादर होईल ह्मणोन लिहिणें
१ कमावीसदार पडेल तरि, चिटनिसांनी ल्याहावें;
१ देशमुख देशपांडे सनद मजरा असे ह्मणोन फडणी-
---- सांनीं ल्याहावें. बुडती रसद
३ येखादियांणीं कबूल केली असली
---- ती पाठवणें तरि चिटनिसी. त्याज-
४ वरी तूट वरात फडनिसी. कलम.
सदरहू खेरीज साहित्यपत्रें १
लागली तरि चिटनिसी कलम तबूक रोखे चिटनिसी.
१ १ १ शेताचे.
ताकिदराख चिटनिसी १ बाकी तबूक जाली तरि.
१ सरंजामाचे १ नापीक जालें तरि त्याची
१ शेतसनदाचे पाहणी जालियावरि वसूल
१ वरातेचे घेतला जाईल. तूर्त तकूब
१ वृत्तीचे असे, ह्मणोन पत्र.
१ इनामाचे -------
----- ३
५ येकूण कलम १
येकूण कलम प्रायश्चित्त देणें तरी गोतांहीं
१ करावयाची आज्ञा जोशी उपाध्ये
सरंजाम व इनाम अगर वतन यांस पाहिजे. त्यास, ब्राह्मणास,
अगर वर्षासन स्वराज्यांत अथवा व शूद्रास हरकोणास पत्र देणें
परराज्यांत चालत असेल त्याची ते चिटणीसी. प्रायश्चित्तामुळें
फिरून ताकीदपत्रें व भोवटी हरकी व शेला दिवाणांत घेतला
यांस पत्रें करून देणें तरि चिट- तरी अमके रुपये जमा ह्मणून
निसी गांवसुद्धा इतकीच अक्षरें फडणिसी. वरकड
कलम पत्रें चिटणिसी. रुपयाशिवाय पत्र
१ जालें तरी फडणिसीकडील कांहीं
नाहीं
पुरातन वतनाचा इनसाफ बो- कलम
लून वतनकरार जालियावरि १
त्याचीं पत्रें चिटनिसी. वतनदा- हरकोणांस परस्परें कजिया
राचीं पत्रें, अगर जिह्मेदारास पत्र होऊन दिवाणांत आला. तरी
होईल त्याजमध्यें हरकी शेरणी निवाडियाप्रमाणें खर्यास हरकी,
करार होईल ती आमके रुपये व खोट्यास गुन्हेगारीची बेरिज
इतकें मात्र फडणीसांनी ल्याहावें. मात्र फडणिसांनी भरावी.
आलाहिदा फडनिसीचा कागद कलम
व्हावयाचा नाहीं. चिटनिसी का- कलम १
गदांतच त्यांणी शेरणी भरावी.
कलम हुजरून कोणास गांवास, व
१ कोटास, व परगण्यास, आमलदार
पाठविला. तरी हुजूरच्याप्रमाणें
नूतन हरकोण्हास वतन इनाम करार ह्मणेन जिल्हेकडील पत्रें
दिल्हा. तरी ज्यास द्यावें त्याच्या सारीं चिटणिसी.
नांवाचें पत्र फडणीसी. त्याजम- कलम
ध्यें वतनामुळें रुपये आमके घेत- १
ले तरी ते ल्याहावे. बाजे जीं
पत्रें होतील तीं चिटणिसी. कलम खंड, गुन्हेगारी, व हरकी, व
१ पैदास्त, व हद्द, अमल, याचीं
पत्रें चिटणिसी. कलम
तलावांतील वसाहतीचा कौल १
चिटणिसी. कलम हरयेकाचे माल येत वगैरे जफ्त
१ करणें, व ज्याची त्यास देवणें,
तीं पत्रें चिटणिसी. कलम
हरकोणास वरात दिल्ही. ती
पावण्यास दिकत लागलियास ता-
कीदपत्र वरातेप्रमाणें रुपये आदा धरजागा, व ठिकाण, लाकूड-
करणें ह्मणोन चिटणिसी. वरात फाटे, शेतभात, अमानत करवणें,
शंभराची असली, त्यास माहालीं आगर देवणें, त्याची पत्रें चिट-
ऐवज नसला, तरी वरातेपैकीं णिसी. कलम
पन्नास करून देणें तरी फडणिसी. १
आणि एकवेळ शंभराची वरात गडकोट, किल्ला, वगैरे देणें,
दिल्ही. संवचे दूर जाली. फिरून घेणें, व येखादियास कैद करू
रदबदलीमुळें करार जाली, तरी ठेवणें, आगर सोडणें, ती प
चिटणिसी. शंभराचे शंभर करार चिटणिसी. कलम
जाले, तरी चिटणिसी. आधिक १
उणें जाल्यास फडणिसी. कलम राजकारणी बातम्याची पत्रें
१ चिटणिसी कलम
तलबरोखा चिटणिसी. कलम १
१ कोटाचीं व रहदारीचीं दस्तकें
वतनी माहालांत बादर वगैरे चिटणिसी. कलम
कानू जाबते करून देणें तें १
चिटणिसी कलम
१
इरसाल दारुगोळा, रुपये, व
कापड वगैरे सामान हुजुरून किल्ले,
कोट, ठाणीं वगैरे जागा रवाना
केलें, तरी पत्रें, आल्या कागदाचा
लाखोटा फोडून कागद वाचून
दाखवणें, चिटणिसांनीं, दाखवावें.
कलम
१
एकूण कलमें
खासदस्तकीं हातरोखा जो लिहिणें तो चिटणिसी. हरकोण्हास किल्ला कोट व सरंजाम देणें, व इनाम वतन करून देणें, व कोणास मरातीब देऊन पद सांगोन वस्त्र पाठवणें हेविसीं लिहीणे, व खंड गुन्हेगारी हरकी व मसाला नजर वगैरे भरणें, तो चिटणिसांनींच लेहून भरावा. त्याची यादि लेहून फडणिसाकडे पाठवावी. हातरोख्याचा लाखोटा चिटणिसांनी करावा.
कलम
१
एकूण कलमें
सदरहू चिटणिसी जाबता कलमें पत्राची व हातरोख्याचीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०८
श्रीशंकर १६२९ पौष वद्य १२
सदानंद
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजितनाम संवत्सरेब पौष्य बहुल द्वादशी गुरुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यानी राजश्री देशाधिकारी व देशलेखक वर्तमान भावी प्रात वाई यासि आज्ञा केली ऐसी जे भवानगिरी गोसावी वास्तव्य कसे निंब प्रा। मजकूर हे हुजूर येऊन विदित केले ही आपण चदीचे मुकामी राजश्री राजाराम कैलासवासी याजपाशी चदीस जाऊनु विदित केले की श्री गोसावी स्थल कसबे निंब प्रा। मजकूर येथे याची समाधी आहे अनादि बहुत पुण्य स्थल जागृत जगप्रख्यात आहे त्याचे परंपरेचे आपण शिष्यवर्ग या स्थली राहतो श्री स्वामीची समाधीची सेवा करितो समाधिस्थानी धूपदीपपूजनैव्यद्यपुण्यतिथीचा उत्साह चालावयास इनामगाव दिल्हा पाहिजे त्यावरून तेही मौजे इडेमिडे सा। निंब हा गाव इनाम दिल्हा आहे तेणेप्रमाणे महराजे आपले पत्र करून दिल्हे पाहिजे ह्मणऊनु विदित केले त्यावरून पेशजीची सनद आणून पाहौनु तेणेप्रमाणे हाली मौजे इडमिडे सा। निंब प्रा। मजकूर हा गाव करार करून इनाम दिल्हा असे देह १ एकरास कुलकानू कुलाब देखील हाली पटी व पेस्तरपटी झाडझाडोरा पडिले पानसहित खेरीज हकदार व इनामती करून गाव दिल्हा असे तर चतुसीमा भूमीसहित गाव याचे दुमाले करणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र समाधीचे अधिपत्यकर्ता गोसावी यासि परतोन देणे
तेरीख २५ सौवाल सु॥ समान मया अलफ
सुरुसूद बार