लेखांक २०८
श्रीशंकर १६२९ पौष वद्य १२
सदानंद
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजितनाम संवत्सरेब पौष्य बहुल द्वादशी गुरुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यानी राजश्री देशाधिकारी व देशलेखक वर्तमान भावी प्रात वाई यासि आज्ञा केली ऐसी जे भवानगिरी गोसावी वास्तव्य कसे निंब प्रा। मजकूर हे हुजूर येऊन विदित केले ही आपण चदीचे मुकामी राजश्री राजाराम कैलासवासी याजपाशी चदीस जाऊनु विदित केले की श्री गोसावी स्थल कसबे निंब प्रा। मजकूर येथे याची समाधी आहे अनादि बहुत पुण्य स्थल जागृत जगप्रख्यात आहे त्याचे परंपरेचे आपण शिष्यवर्ग या स्थली राहतो श्री स्वामीची समाधीची सेवा करितो समाधिस्थानी धूपदीपपूजनैव्यद्यपुण्यतिथीचा उत्साह चालावयास इनामगाव दिल्हा पाहिजे त्यावरून तेही मौजे इडेमिडे सा। निंब हा गाव इनाम दिल्हा आहे तेणेप्रमाणे महराजे आपले पत्र करून दिल्हे पाहिजे ह्मणऊनु विदित केले त्यावरून पेशजीची सनद आणून पाहौनु तेणेप्रमाणे हाली मौजे इडमिडे सा। निंब प्रा। मजकूर हा गाव करार करून इनाम दिल्हा असे देह १ एकरास कुलकानू कुलाब देखील हाली पटी व पेस्तरपटी झाडझाडोरा पडिले पानसहित खेरीज हकदार व इनामती करून गाव दिल्हा असे तर चतुसीमा भूमीसहित गाव याचे दुमाले करणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र समाधीचे अधिपत्यकर्ता गोसावी यासि परतोन देणे
तेरीख २५ सौवाल सु॥ समान मया अलफ
सुरुसूद बार