[ ११४ ]
श्री. शके १६५९ भाद्रपद बा। ३०.
रा। शिवजी नाईक अणजूरकर गो॥
स्नो। चिमणाजी बल्लाळ. सु॥ समान सलासीन मया अलफ. वसईवरी हल्ला जाहाली ते प्रसंगी तुह्मीं मनें वाढवून मेहनत केली ह्मणोन विदित जाहालें. तर तुह्मी मर्द आहां ! जे लोक जे साहेबकामाविशीं मनें वाढवितील त्यांचे ऊर्जित होईल. जे ठार जाहाले आहेत, त्यांच्या मुलामाणसांचें चालविलें जाईल. जखमी जाले असतील त्यांची निगा करून बरें करणें. लोकांचे दिलासे करणें. जाणिजे. छ. २८ जमादिलावल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.