लेखांक २११
श्री १६३० चैत्र शुध्द ४
तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वधारीनाम सवत्सरे चैत्र शुध चतुर्थी इदुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शाहु छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमानभावी प्रात वाई यासी (शिक्का) आज्ञा केली ऐसी जे भवानगीर गोसावी वास्तव कसबे निंब प्रात मा।र याणीं हुजूर येऊन विदित केले कीं श्री सदानद जागृत स्थल मठ कसबेमजकुरी आहे तेथे अन्नछत्राबद्दल राजश्री राजाराम कैलासवासी स्वामीनी गबाबवगना इनामभूमि दिल्ही आहे चावर १ एक ता। कसबे निंब चावर ॥ मौजे गोवो सा। निंब चावर ॥ येणेबप्रो। एक चावर इनाम चालत आहे तेणेप्रो। स्वामीनी चालविले पाहिजे म्हणोन विनती केली त्या(व)रून मनास आणिता श्रीसदानद गोसावी जाग्रत स्थल तेथे अन्नछत्र चालिले पाहिजे याकरिता पेशजीप्रो एक चावर जमीन सदरहू करार करून तुह्मास हे आज्ञापत्र सादर केले तरी सदरहू एक चावर जमीन पेशजी इनाम चालिला असेल तेणेप्रो। चालवीत जाणे नवीन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहोन घेऊन मुख्य पत्र भोगवटीयाद्दल गोसावीयाजवळ देणे निदेश समक्ष मोर्तब