[ ११३ ]
श्री. शके १६५९ भाद्रपद शुद्ध ९. मा। अनाम देशमुख व मुकदम व देशपांडे का सासवड यांसिः--
बाजीराऊ बल्लाळ प्रधान. सु॥ समान सलासैन मया व अलफ. सावजी झेंडे, व रुपाजी झेंडे, व कृष्णाजी झेंडे, व सुलबाजी झेंडे, मौजे दिये, का। मजकूर, यांणीं हुजूर येऊन विदित केलें कीं, आपली आजी पूर्वी हिवरकराची लेंक; कामथियास दिल्ही होती. तिचा दादला मयत जालियावर, आपली आजी, पिलाजी पाटील झेंडे, मौजे मजकूर, यापाशी होती. मुहूर्त लागेन वर्तवावी, ऐसा निश्चये असतां काळ पडोन परागंदा होत फिरणें लागलें. त्यामुळें आपला बाप-जावजी–झेंडा–तिचे पोटीं मुहूर्त न लागतां निर्माण जाहाला. पुढें गोतपत करून गोतांत घ्यावे, तों दुष्काळ पडला. यामुळें गोतपत राहिली. सांप्रत, गोतास शरण जाऊन, जाली हकीकत गोतास सांगितली. त्यास, विपरीत काळामुळें ऐसे प्रसंग कित्येक बनतात. त्यास, सरकारची आज्ञा जालिया गोतांत घेऊन पावन करूं, ऐसें गोतानें ह्मटलें आहे. तरी साहेबीं कृपा करून गोतपत करावयाची आज्ञा जाहाली पाहिजे, ह्मणोन. त्यावरून मनास आणितां, ऐसे प्रसंग शूद्र लोकांत होऊन गोतपती जालिया आहेत. तदनरूप याची व्हावी, उचित जाणोन हें पत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं तुळापुरीं श्रीभीमासंन्निध जाऊन, या चतुरवर्गाचें कन्यासंतान खेरीजकरून, पुत्रसंतान यांच्या स्त्रियांसहित गोतांत घेऊन, याच्या वंशपरंपरेनें अन्नवेव्हार व शरीरसंबंध होऊन गोतांत वर्तत, ऐसें करणें. जाणिजे. छ. ७ जमादिलोवल. आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरप-
ति हर्षनिधान बाजी-
राव बल्लाळ प्रधान.