लेखांक २१२
श्री १६३० आषाढ वद्य ६
सदानंद
राजमान्य राजश्री नारो पिलाजी दि॥ साहोत्रा प्रा। वाई यासि
सेवक नारो शकर सचीव नमस्कार सु॥ तिसा मया अलफ मौजे इडमिडे सा। निं हा गाव राजश्री याकडे इनाम आहे त्यास तेथील साहोत्रीयाचा ऐवज तीर्थरूप राजश्री पंताजी गोसावी याकडे देविला आहे ह्मणून गोसावी यानी विदित केले ऐशास पाहिले तीर्थरूप राजश्री पताची सनद तुह्मास असिली तरी मौजे मा।रास साहोत्रीयाचा तगादा न लावणे सनदेप्रमाणे पुढे चालवणे छ २९ रबिलाखर जरी पहिली सनद असिली तरी हाली रोखा केला आहे तो मना करणे
सुरुसूद