लेखांक २०९
श्रीशंकर १६२९ माघ शुध्द १
सदानंदस्वामी
राजश्री सुभेदार व कारकून मा। सरदेशमुखी
प्रा। वाई गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। हिंदुराव घोरपडे सरदेशमुख दडवत सु॥ समान मया अलफ मौजे इरमडे सा। निंब हा गाव गोसावी यास इनाम आहे तेथील सरदेशमुखी हिजा ऐवज जो आकारेल तो त्याचे दुमाला करणे गावास उपसर्ग एकंदर न देणे जाणिजे छ २९ शौवाल
बारसुद