लेखांक २१०
श्री १६२९ माघ वद्य ९
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजित सवत्सरे माघ बहुल नवमी भौमवासरे क्षत्रियकुलवतस श्री राजा शाहु छत्रपती स्वामी यानी देशाधिकारी व कारकून वर्तमानभावी सुभा प्रात जाउली यास आज्ञा केली ऐसी जे कृष्णगिरी गोसावी ह्मैसगिरी गोसावी याचे शिष्य वस्ती मौजे धाडेघर ता। बारामुरे हुजूर येऊनु विदित केले कीं आपले गुरु यासि थोरले राजश्री कैलासवासी स्वामी यानी तादुळ कोठी मापे मण पाच धर्मादाय दिल्हा होता तो चालत होता त्यावरी ह्मैसगिरी यानी समाधी घेतली आपण मठी वास्तव्य करून आहो त्यावर आपण राजश्री शिवाजी राजे याजवळी जाऊनु पूर्वील वर्तमान विदित करून पाहिले प्रो। पाच । मणाची धर्मादायाची सनद घेतली आहे तेणेप्रमाणे चालत आले आहे तर महाराजेही चालविले पाहिजे ह्मणऊनु विनति केली त्यावरून चिरजीव राजश्री शिवाजी राजे याचे पत्र आणून पाहोनु तेणेप्रमाणे गोसावी याचा धर्मादाय तादूळ कोठी मापे मण .।. पाचा करार करून तुह्मास आज्ञा केली असे तर तुह्मी सालगु॥ता। चालत आले असेली तेणेप्रमाणे गोसावी जोवर वर्तमान असेली तोवर चालवीत जाणे प्रतिवरशी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती घेउनु असल पत्र भोगवटीयासी गोसावी यापाशी फिराऊनु देणे
तेरीख २१ जिल्काद सु॥ समान मया अलफ
बार सुरुसुद बार