Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(३) द्वापारयुगी मिथुनावस्था समाजाला आली. काही काल स्थिर राहणा-या जोडप्यांनी प्रजोत्पादन करण्याची पद्धती उदयास आली. त्रेतायुगात सर्व मुले सर्व समाजाची ऊर्फ सबंध टोळीची समजत. सर्व बाप्ये हे सर्व मुलांचे बाप आणि सर्व स्त्रिया सर्व मुलांच्या आया एवढाच संबंध त्रेतायुगात अस्तित्वात होता. द्वापरयुगात मिथुनावस्था प्रचलित झाल्यावर मुलाचा बाप अमुक व आई अमुक इत्यादी वैशिष्टीकरण आस्ते आस्ते उद्भूत झाले. आणि-

(४) कलियुगात द्वंद्वावस्था म्हणजे विवाहसंस्था प्रचलित झाल्यावर पिता, पुत्र, भ्राता, भगिनी, चुलता, मामा, आई, पणजी इत्यादी वर्तमानकालीन नाती क्रमाक्रमाने समाजाच्या अनुभवास येऊ लागली. एकंदरीत भीष्मांनी वर्णिलेल्या निरनिराळ्या युगांतील स्थिती ऐतिहासिक आहे, व इतक्या प्राचीन काली ती इतक्या उत्कृष्ट त-हेने मांडल्याबद्दल त्या थोर बुद्धिमान पुरुषाचे आपण ऋणी आहोत. द्वापरयुगी मिथुनधर्म प्रचलित झाला म्हणून सांगितले. तत्संबंधी तपशीलवार विवेचन पुढील निबंधात करू.