Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश

मनाई [ मनायी ( मनोःस्त्री) = मनाई = मनी ( स्त्रीनाम ). मनावी ( मनोः स्त्री ) = मनाउई = मनू]
(भा. इ. १८३४)

मनी १ [ मनसा = मणहा = मणी = मनी, मनु. (कारंडव्यूह किन्नरकन्यानामानि)] (भा. इ. १८३४)

-२ [ मनावी, मनायी (मनुचें स्त्रीलिंग) = मनी ]

मनु [ मनसा ] (मनी १ पहा)

मनू [मनावी ] ( मनाई पहा )

ममती [ममता (स्त्रीनाम) = ममती ] ममती हें नांव शूद्रांत फार. (भा. इ. १८३३)

मम्मट - मन्मथ ह्या शब्दाचें अपभ्रंशांत वम्मह असें रूप होतें. व चा ब होऊन बम्मह आणि म्म च्या दैर्घ्यामुळें ब चा बा होऊन बामह. बामह ह्या प्राकृतिक शब्दाचें संस्कृत संस्करण भामह. मन्मथ ह्याच शब्दाचें न्म चें म्म व थ चें ट होऊन मम्मट.
प्राकृतिक म्हणजे मराठी वगैरे भाषा सुरू झाल्यावर हे दोघे ग्रंथकार झालेले अहित, हें पाहिलें म्हणजे मम्मट व भामह हीं नांवें प्राकृतिक आहेत, हें तेव्हांच ओळखतां येतें. (भा. इ. १८३२) 

मयु-१ “The earliest of these Indo-Parthian kings apparently was Maues or Mauas who obtained power in the Kabul valley and Panjab about १२० B.C., and adopted the title of Great king of Kings'.
ह्याप्रमाणें Vincent Smith ( Early History of India, P. २०२ First Edition), Maues हा कदाचित् Indo-Parthian वंशाचा राजा असावासा दिसतो, असें लिहितो. तात्पर्य, Maues Indo-Parthian असावा किं नसावा ह्या बद्दल इतिहासकारांस संशय आहे. Maues हा Indo-Parthian वंशाचा नाहीं, हें सिद्ध करण्यास मजजवळ कांहीं सामग्री जुळली आहे, ती इतिहासज्ञांच्या पुढे मांडण्याची परवानगी घेतों.

विष्णुपुराण-चतुर्थांश-अध्याय २४-अंक-१३ :-

" ततश्चाष्टौ यवनाः चतुर्दश तुषाराः मुंडाश्च त्रयोदश एकादश मौनाः । ” 

असें वाक्य आहे. ह्यांत मौनाः म्हणून जो शब्द आहे तो व Maues हा शब्द एकच आहेत, असें मी म्हणतों.