Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश

-बा [ पाद = पाअ = वाअ = बा. ]
देवपादाः देवपाआ = देववाआ = देवबा.
गणपादाः = गणबा.
गोविंदपादाः = गोंदबा.
हरिपादाः = हरबा.
नारायणपादाः = नारबा.
महादेवपादाः = म्हदबा.
बल्लालपादाः = बाळोबा. इ. इ. इ.] ( भा. इ. १८३५)

बाची १ [ वासू: (a young girl) = बाची, बचू ]
-२ [ वत्सा ] (बची पहा )

बाचू [वासू = बाचू (पुत्रीनाम)] वासू म्हणजे मुलगी.
बाजीराव - इ. स. १२४१ त बाचीराज कर्नाटकांत अधिकारी होता. च चा ज होऊन बाजीराव हें आधुनिक नांव निष्पन झालें. (भा. इ. १८३२)

बाबण-[ पाप्मन् = पापण=वावण=बाबण(विशेषनाम)] (शब्द-आबण बाबण पहा)

बामनजी [ वामनादित्य] (आदित्य पहा) 

बामह [ मन्मथ ] (मम्मट पहा) 

बालाजी [ बालादित्य ] ( आदित्य पहा)

बास [ वयस्य = वअस्स = बास्स = बास = बाह = बा ] विठ्ठलबास, कान्हबास वगैरे नांवें मानभावग्रंथकारांत फार. ह्या नांवांतील बास हा शब्द संस्कृत वयस्य शब्दापासून निघाला आहे व त्याचा अर्थ Companion, associate असा आहे.
मराठींत गणबा, गोंदबा, वासबा वगैरे शब्दांतील बा हा अवयव हि ह्या संस्कृत वयस्य शब्दापासूनच निघालेला आहे. (भा. इ. १८३४)

बाळ [ बाल ] (स. मं. शके १८२७) 

बाळक्या-की-क [ बालक] (बाळा पहा)

बाळभट [ बाल + भट = बाळभट ] (भा. इ. १८३४) 

बाळंभट [ बहलण = बल्लण = बाळण = बाळम्, बाळम् + भट = बाळंभट ] बाळ म्हणजे मुलगा ह्या शब्दाशीं कांहींएक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४ ) 

बाळा-ळी-ळ [ बालक = बाळअ = बाळा-ळी-ळ, बाळक्या-की-क ] (स. मं. गोतवळा शके १८२७)

बाळाजी १ [बालराज ] (बल्लाळ पहा.) 

-२ [ बालादित्य ] (आदित्य पहा) 

बाळोजी [बालादित्य ] ,,

बिकर्मजी [ विक्रमादित्य ] ,,
बिंबदेवाला भीमुदेव असें हि म्हणतात.