Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश

पुंजा [ पुंजराज = पुंजा (एक देश) ] हें विशेषनाम' खानदेशांत बरेंच आढळतें. (भा. इ. १८३५)
पुलुमायी - हें विशेषनाम शातवाहनवंशांतील राजांच्या नांवांत येतें. पुरुमायी = पुलुमायी. पुरुमायी म्हणजे पुष्कळ माया, लक्ष्मी ज्या जवळ अहे तो, श्रीमान्, धनवान्, लक्ष्मीवान्, पुरूरवस्,
पुरुकुत्स, पुलोमन्, पुलुमन्, ह्या विशेषनामांतील आद्यावयव पुरु आहे, असें दिसतें. ( भा. इ. १८३३)

पेंदा [ वद् १ भाषणे. प्रियंवद: = पिअंवदो = पेंदो = पेंदा] पेंदा हें कृष्णाच्या मित्राचें नांव. ( धा. सा. श. )

पेंद्या [ उपेंद्रक: = (उलोप) पेंद्या, पेंदा ] कृष्णाचा एक खेळगडी.

बगाजी [ भगादित्य ] (आदित्य पहा) 

बगु [ भग ] (भगु पहा )

बगू [ भर्ग: = बगू, बगाजी ]

बगोजी [ भगादित्य ] ( आदित्य पहा)

बचंभट [ वत्स = वच्छ = बचं ( भट ), बजं (भट)] 

बचाजी [वत्स किंवा वर्चस्] 

बची [ वत्सा (मुलगी ) = बाची, बची ] 

बच्चू [ वासू: ] (बाची १ पहा) 

बजंभट [ वत्स ] (बचंभट पहा ) 

बजरंग [ वज्रांग = वजरांग = बजरंग. रातील अ चा अ झाला ] हा शब्द अंजनीपुत्राचा वाचक आहे. (भा. इ. १८३३)

बंड, बंडू [ भंड = बंड, बंडू (ममत्वदर्शक) ] बंडोपंत हें नांव मराठींत सामान्य आहे. ( भा. इ. १८३५)

बनशीधर १ [ बंशीधर = बनशीधर, बंशी = मुरली ] 
-२ [ वंशीधर ( कृष्ण) = वनशोधर, वंशी ( कृष्ण ) = वनशी. वंशी ( स्त्री ) वाद्यविशेषः. वंशिन् ( पुं. ) वंशवाद्य ज्याच्या जवळ आहे तो. (भा. इ. १८३६)

बनी [ वनिता = बणिआ = बणी = बनी ] मराठींत स्त्रीनाम आहे. (भा. इ. १८३४)

बल्लाळ [ मूळशब्द बालराज. त्याचें अपभ्रष्ट रुप बलराज. त्याचें बालल, त्याचें बालळ, त्याचें स्वरव्युत्क्रमानें बलाळ, त्याचें जोरदार बल्लाळ - बाल - बाळ - बाळजी - बाळाजी, बाळोजी.
बल्लाळ व 
बाळाजी ही दोन्ही रूपें एकाच व्यक्तीचीं वाचक असतात ] (सरस्वतीमंदिर शके १८२६) 

बसन्त्ये [ वसंतिके ] ( दासींचीं नांवें पहा )