Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
लोलू [ लोहल: ( अस्फुटवादी ) = लोलू ] लोलू अण्णा हें मराठींत विशेषनाम झालें आहे. अस्फुट बोलणार्या मुलाला प्रथम प्रथम लोलू म्हणत.
वच्छे [ वत्सिके ] (दासींचीं नांवें पहा)
वाघूजी, वाघोजी [ व्याघ्रादित्य ] (आदित्य पहा)
वामनाजी, वामनोजी [ वामनादित्य ] ( आदित्य पहा)
वारी [ वर्या (स्वयंवरा बाला) = वार्या = वारी ] वारी हें मराठींत स्त्रीविशेषनाम आहे. (भा. इ. १८३२)
वाली, वालू, वाल्ही [वाल्मीका = वाल्ही, वाली ] वाली, वाल्ही, वालू हीं मराठींत स्त्रीनामें आहेत.
वाल्ह्या [ वाल्मीकिकः = वाल्हीइआ = वाल्हीआ = वाल्ह्या ] वाल्ह्या कोळी विशेषनाम.
विजेसेन [ विजितसेन = विजियसेन = विजसेन, विजेसेन ] ( भा. इ. १८३५)
विष्णाजी, विष्ण्याजी [ विष्ण्वादित्य] (आदित्य पहा)
विसाजी, विसोजी [ विश्वनाथादित्य ] ( आदित्य पहा )
वीटु - सीयडोणी शिलालेखाच्या ४ थ्या व २७ व्या ओळींत वीठु हा शब्द आलेला आहे. म्हणजे हा शब्द शक ८७६ त प्रचलित होता. विष्णूचीं म्हणजे वीठूचीं देवळेंही होती. अर्थात्, पुंडलिकानें पंढरीस वीठूचें प्रतिष्ठापन करण्याच्या अगोदर निदान नर्मदेच्या उत्तरेस वीठूचीं देवळें असत; व त्या देवळांला सर्व जातीचे लोक देणग्या देत. ( सरस्वती मंदिर-संकीर्ण लेख )
शंकराजी, शंकरोजी [शंकरादित्य ] (आदित्य पहा)
शबरे [ शबरिके ] ( दासींचीं नांवें पहा )
शाम्या [ शर्मन् = शाम्या ] (भा. इ. १८३४)
शिउजी [ शिवादित्य ] ( आदित्य पहा)
शिदू, शिदोजी, शिदोबा [ सिद्ध = शिद, शिदू. सिदनाथवाडी, सिदोपंत, सिदनाथ, शिदोबा, शिदोजी इ इ.] (भा. इ. १८३३)
शिरळशेट - शिराळशेट [ श्रीलश्रेष्ठिः = शिरळशेट = शिराळशेट ] शिराळशेट म्हणजे धनाढ्य शेट. श्रील हें विशेषनामहि आहे. सामान्यनामहि आहे. (भा. इ. १८३४)
शिवाजी [ शिवादित्य ] (आदित्य पहा)
शेवंते [ सीमंतिनि ] ( दासींचीं नांवें पहा )
सई [ सती = सई. सईबाई = सती ] (भा. इ. १८३४)
सखुली ( ममत्वदर्शक) - ला - लें [ सखी शब्दाचें ममत्वदर्शक सखु. सखु + ल = सखुल ( ल-ली-लें ) ]
(भा. इ. १८३४)