Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
३० मह्न उच्चारांकित उत्तम पुरुषसर्वनाम व नह्नउच्चारांकित उत्तम पुरुषसर्वनाम अशा या दोन्ही सर्वनामांच्या रूपांचे मिश्रण मिश्र वैदिक समाजाच्या भाषेत होऊन पाणिनीने जी वैदिक व स्वकालीन रूपे दिली ती सुप्रसिद्ध असल्यामुळे येथे पुन: देत नाही, मह्न सर्वनामवाले उपसर्ग लावून वचनरूपे तयार करीत व न-सर्वनामवाले प्रत्यय लावून वचनरूपे तयार करीत. हे उपसर्ग लावणारे लोक कोण? व प्रत्यय लावणारे लोक कोण? न सर्वनाम झंदभाषेतही येते तिसराही एक अभ्युपगम आहे. तो असा की वैदिक आर्यांच्या पूर्वजातच शब्दांची रूपे उपसर्गानेही साधण्याचा प्रघात असे. हा प्रघात क्रियापदांच्या रूपात स्पष्ट दिसून येतो. लुङ्, लङ् व लृङ् यांत धातूंच्या मागे उपसर्ग लागून रूपे होतात. अ व अन् हे उपसर्ग शब्दांनाही पाठीमागे लागून अंतरंह्नअनंतरं, आत्माह्नअनात्मा, पुत्र:ह्नअपुत्र: अशी रूपे होतात. म्हणजे वैदिक आर्यांच्या पूर्वजात उपसर्गांने रूपे साधणारा एक समाज होता व प्रत्ययाने रूपे साधणारा दुसरा समाज होता. या दोन समाजांचा मिलाफ होऊन वैदिकसमाज उत्पन्न झाला. उपसर्गाने रूपे बनविणारा जो समाज होता तो आपली उत्तम पुरुषवाचक सर्वनामरूपे उपसर्ग लावून बनवी आणि प्रत्ययाने रूपे बनविणारा समाज उत्तम पुरुषसर्वनामरूपे प्रत्यय लावून बनवी, पैकी उपसर्गवाल्यांची छाप प्रत्ययवाल्यावर पराकाष्ठेची पडून उपसर्गवाल्यांची प्रथमपुरुषसर्वनामाची रूपे संमिश्र समाजात प्राधान्याने प्रचलित झाली व प्रत्ययवाल्यांची रूपे गौणत्वाने अधेमधे राहिली. या तीन अभ्युपगमातून हा शेवटला तिसरा अभ्युपगम सर्वात विशेष ग्राह्य वाटतो. तत्रापि त्यातही एक गोम आहे. उपसर्गवाले तरी उपसर्गाने रूपे तयार करण्याचा प्रघात कोठ्न शिकले व प्रत्ययवाले प्रत्ययाने रूपे बनविण्याची कला कोठून शिकले? मूळ, प्रत्येक समाजाने तो तो प्रघात स्वत: स्वतंत्रपणे शोधून काढला किंवा इतर आर्यानार्य समाजाच्या अनुकरणाने सुरू केला? इत्यादी प्रश्न याही अभ्युपगमा वर सुचतात. परंतु एकंदरीत हा तिसरा अभ्युपगम मला विशेष आदरणीय वाटतो. कोणताही अभ्युपगम स्वीकारा, एवढे निश्चित झंदभाषा प्रत्ययी भाषा आहे. वैदिकभाषा प्रत्ययी भाषा आहे हे अजन्त व हलन्त शब्दांची वचनरूपे पहाता सहज कोणाच्याही नजरेस येईल. फक्त उत्तम पुरुषवाचकसर्वनामाची मकारी रूपे तेवढी उपसर्ग लावून झालेली आहेत. तेव्हा ही विपरीतधर्मीं रूपे मूळची वैदिकलोकांच्या साक्षात पूर्वजांची नव्हत, दुसऱ्या कोण्यातरी लोकांची आहेत. वैदिक लोकांच्या पूर्वजांची नौ व न: ही दोनच रूपे राहिली आहेत, बाकी सर्व एकवीसही रूपे उपसर्गवाल्यांच्या भाषेतील आहेत. घरच्या रूपांना इतके पराकाष्ठेचे गौणत्व येणे आणि परकीय रूपांची इतकी बेसुमार व्याप्ती होणे व ती उत्तम पुरुषवाचक हरहमेष बोलण्यात येणाऱ्या सर्वनामांच्या रूपात होणे म्हणजे प्रत्ययी लोकांवर उपसर्गी लोकांची छाप सर्वतोपरी बसणे असा अर्थ होतो. वैदिक आर्याच्या पुरातन पूर्वजावरती असली जबरदस्त छाप बसविणारे असे हे उपसर्गी भाषा बोलणारे लोक कोण? आर्यांच्या शेजारचे उपसर्गी भाषा बोलणारे लोक म्हटले म्हणजे पहलव तेवढे दिसतात. पहलवी भाषेत उपसर्ग लावून वचनांची रूपे बनतात. अत्यंत पुरातनकाली पहलवांच्या पूर्वजांनीं वैदिक आर्यांच्या पूर्वजांना पादाक्रान्त करून आपली भाषाही बोलावयास लाविले असे म्हणावे लागते. असे दिसते की, वैदिकआर्यांच्यापैकी एका टोळीची व पहलवांच्या पूर्वजांची गाठ पडून, तीत आर्यंपूर्वज पहलवांचे अंकित दास झाले. या दास स्थितीत ते स्वभाषेला पारखे इतके झाले की, पूर्वीचे उत्तम पुरुषसर्वनामही त्यांच्या बोलण्यातून गेले व जेत्यांचे सर्वनाम हरहमेष वापरण्यात आले.