Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
येणेप्रमाणे सहा बोळांतून वाट काढीत काढीत अहम् या विठोबाचे दर्शन पाणिनी घडवितो. इतका प्राणायाम न करिता, अस्मत्चे प्रथमेचे एकवचन अहम् होते, असे निपानत पाणिनीने केले असते तरी काहीच बिघडले नसते. बरे, इतके सहा फेरे घेऊन व अनेक गिरकांड्या खाऊन, अहम्चे काही गणगोत कळते म्हणावे तर तसाही काही लाभ नाही. फक्त अस्मत्चे अहम् होते एवढे कळते. तात्पर्य, अहम्चे गणगोत जाणावयाचे असल्यास, पाणिनीचा रस्ता कुचकामाचा ठरतो. गणगोत जाणावयाचे असल्यास, पाणिनीच्याहून निराळा मार्ग स्वीकारला पाहिजे. पूर्ववैदिककालीन भाषांत उत्तम पुरुषवाचक सर्वनामे दोन सांच्यांची असत. एक सर्वनाम हम या सांच्याचे व दुसरे सर्वनाम हन् या सांच्याचें. हम् या सांच्याच्या सर्वनामाचा उच्चार हम, हम्, अहम् असा वेळ पडेल त्याप्रमाणे तीन प्रकारचा असे व हन या सांच्याच्या सर्वनामाचाही उच्चार डन्, हन्, अहन् असा तीन प्रकारचा असे. पूर्ववैदिकलोक कंठ्या उच्चार फार करीत त्यामुळे सव्यांची स्, क्, प्, म्, न्, इत्यादी सर्व व्यंजने ते प्राय: महाप्राण घालून हस्, :क्, :प, हम्, हन्, अशी उच्चारीत. तात्पर्य, वैदिककाली जो उच्चार म् झाला तो उच्चार पूर्ववैदिककाली हम् असे. उत्तम पुरुषवाचक सर्वनामांसंबंधाने लक्षात ठेवण्यासारखी ही पहिली बाब होय. लक्षात ठेवण्यासारखी दुसरी बाब म्हटली म्हणजे कित्येक पूर्ववैदिकभाषात वचनप्रत्यय शब्दांच्या पुढे लागत. म्हणजे, पूर्ववैदिककाली भाषा दोन प्रकारच्या असत, उपसर्गाने वचनरूपे बनविणाऱ्या भाषा व प्रत्ययाने वचनरूपे बनविणाऱ्या भाषा. दृष्टांताकरिता मराठी व अरबी या भाषा घेऊ. मराठीत सबब या शब्दाचे अनेकवचन, शब्दाच्या पुढे ई प्रत्यय लागून व अन्त्य अ चा लोप होऊन, सबब + ई = सबब् + ई = सबबी असे होते आणि अरबीत सबब् या शब्दाचे अनेकवचन, अ हा उपसर्ग शब्दाच्या मागे लागून व प्रथमस्वराचा लोप आणि द्वितीय स्वराची वृद्धी होऊन, अ + सबब् = अ + स् वा ब् = अस्बाब् असे होते अर्थात् मराठी ही प्रत्ययी भाषा आहे व अरबी ही उपसर्गी भाषा आहे. हाच भेद पूर्ववैदिकभाषात होता. एक भाषा प्रत्ययी असे व दुसरी उपसर्गी असे. पैकीहम् हे सर्वनाम ज्या भाषेत होते ती भाषा उपसर्गी असून, तीत हे सर्वनाम वचनप्रकरणी येणेप्रमाणे चाले ह्न स् या उपसर्गाने एकवचन दाखवीत. स् + स् या उपसर्गानी द्विवचन दाखवीत, आणि स् + स् + स् या तीन उपसर्गानी त्रिवचन दाखवित.
(१) स् + हम = स् + अहम् = ह + अहम् = हहम् = अहम्, हम्, हम्
(२) स् + स् + हम = ह् + ह् हम = अ + उ + अहम् = औ + अहम= आव् + अहम् = आव् + अअम् = आवाम्.
* पूर्ववैदिकभाषात स् चा हू; ह् चा अ इ किंवा उ; अउ चा उच्चार औ होत असे
हे मागे सांगितलेच आहे.
(३) स् + स्+ स्+ हम् = ह् + ह् + ह् +हम् = उ + अ+ अ + हम् = व + अ+ हम् = व + य + हम् = वयहम् = वयम्.
येणेप्रमाणे उपसर्गी भाषेत
१ २ ३
अहम् आवाम् वयम्