Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
२८ येथपर्यंत जी सर्वनामे सांगितली त्यांच्या स्वभावाहून अत्यंत विपरीत स्वभावाची दोन सर्वनामे आता विवेचनार्थ व पृथक्करणार्थ घेतो. त्या सर्वंनामांना पाणिनी १) अस्मद् व २) युष्मद् म्हणतो. हे दोन शब्द कोणत्याही हलन्त किंवा अजन्त शब्दाप्रमाणे चालत नाहीत. यांना प्रत्ययही निराळेच लागतात. यांची अंगेही निराळ्याच त-हेने सिद्ध होतात. असा सर्वतोपरी विपरीतपणा पाणिनीला या दोन शब्दांच्या रूपसिद्धी संबंधाने भासला. या दोन शब्दांनी पाणिनीला फार छळलेक, या दोन चिमुकल्या पण द्वाड शब्दांकरिता, एकंदर तेवीस स्वतंत्र सूत्रे पाणिनीस रचावी लागलीं. १) प्रत्ययादेशांची सूत्रे, २) अंगादेशांची सूत्रे, ३) अंगान्त्यवर्णादेशाची सूत्रे व ४) रूपद्वजांची सूत्रे अशी उठल्या-बसल्या सूत्रेच सूत्रे काढण्याचे पाणिनीला फार श्रम पडले, एकवीस रूपांच्या सिद्धीकरिता तेवीस स्वतंत्र सूत्रे रचावी लागणे म्हणजे शब्द पराकाष्ठेचे खट्याळ असले पाहिजेत यांत संशय नाही. खरोखरच, हे दोन शब्द सगळ्या वैदिक व पाणिनीय भाषेत अत्यंत मासलेवाईक आहेत. पुढे या शब्दांची जी रूपसिद्धी मी करून दाखविणार आहे तीवरून हा मासलेवाईंकपणा कोणत्या पेठचा आहे ते कळून येईल.
अस्मत् शब्द
समासात शब्दांचे जे रूप येते ते प्राय: प्रातिपदिक समजण्याचा पाणिनीचा प्रघात असल्यामुळे (उदाहरणार्थ, अस्मरत्प्रणीतग्रंथ:), त्याने मूळ शब्द अस्मद् असा मानिला असून, त्या वरून नाना आदेश करून अहम्, आवाम्, वयम् इत्यादी रूपे निष्पन्न केली आहेत. अस्मत् शब्दापासून अहम् रूप तो येणेप्रमाणे काढितो :
(१) अस्मद् + सु अशी स्थिती
प्रथमा एकवचनीं सु स्थानीं अम् आदेश होऊन,
(२) अस्मद् + अम् अशी स्थिती
पुढे सु असता, अस्मद् शब्दातील अस्म् स्थानी अह आदेश होऊन,
(३) अह अद् + अम् अशी स्थिती
द्काराचा लोप होऊन,
(४) अह अ + अम् अशी स्थिती
पररूप होऊन
(५) अह + अम् अशी स्थिती
पूर्वरूप एकादेश होऊन,
(६) अहम्