Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

२३ गेंगाण्यांच्या भाषेत फक्त वचनप्रत्यय असल्यामुळे व संप्रदान, अधिकरण, इत्यादी अर्थ दर्शविणारे विभक्तीप्रत्यय नसल्यामुळे, कोणत्याही शब्दाची एकवचन, द्विवचन व त्रिवचन अशी तीन रूपे असत. त्या रूपांनी ते कर्ता व कर्म यांचा निर्देश करीत. सबब कर्त्रर्थी जेव्हा या रूपांचा उपयोग होई तेव्हा या तीन रूपांना निरनुनासिक समाजाने आपल्या बोलीच्या धर्तीवर प्रथमा विभक्ती हे नाव ठेविले व कर्मार्थी जेव्हा या रूपांचा उपयोग होई तेव्हा या रूपांना द्वितीया हे नाव ठेविले, गेंगाण्यांना बाकीच्या विभक्त्या नव्हत्या, सबब, मूळ शब्दाला तृतीयादी विभक्त्यांचे आपले प्रत्यय निरनुनासिक समाजाने लावून आपल्या आठ विभक्त्याप्रमाणे गेंगाण्यांच्याही शब्दांच्या आठ विभक्त्या सजवून व्यवहार चालता केला. यद्यपि गेंगाण्यांची अशी हलाखी होती व किंचित् उपहासाचे ते विषय झालेले होते, तथापि गेंगाण्यांनी आपला गेंगाणा स्वभाव तृतीयादी विभक्त्यांच्या प्रत्ययावर थापण्याला कमी केले नाही.

(३) मधुँ + स्या = मधुँ + या + मधुँ + या = मधुँ + आ = (अनुनासिकाचा न्

होऊन) मधुना

या तऱ्हेने १) मधुना, २) मधुने, ३) मधुन:, ४) मधुन:, ५) मधुनि, ६) मधुनो: व ७) मधुनो:, ही सात गेंगाणी रूपे निरनुनासिकांच्या प्रत्ययांच्या नाकाडावर गेंगाण्यांनी कायमची चिकटविली व आपण जगतीतलावर कोणीतरी आहोत हे जगाला यावच्चंद्रदिवाकरौ जाहीर केले.