Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

पुल्लिंगी व तदन्तर्गत स्त्रीलिंगी शब्दांच्या रूपांच्या रचनेहून नपुंसकलिंगी शब्दांच्या रूपांची रचना ही अशी अगदी निराळ्या पायावर झाली आहे. नपुंसकलिंगाचे म् व इ हे प्रत्यय एक व दोन या संख्या अनुक्रमे दाखवितात म्हणून सांगितले. या म् ला व इ ला एक व दोन हे अर्थ आले कोठून? म् हा प्रत्यय हम् (मी स्वत:) या शब्दाचा अपभ्रंश आहे व इ हा प्रत्यय त्वि (तू) या शब्दाचा अपभ्रंश आहे. रानटी आर्यांपैकी एक समाज एकही संख्या स्वत: जो हम् म्हणजे आपण त्याने दाखवी व दोन ही संख्या आपल्याहून निराळा जो त्वि त्याने दाखवी. म् व इ प्रत्ययांनी वचने दाखविणारा समाज कोंकण्याच्याप्रमाणे किंवा फ्रेंचांच्याप्रमाणे किंवा डोंगरी भिल्लांच्याप्रमाणे आपली सर्व बोली नाकांतून अनुनासिक बोले. या अनुनासिकप्रधान समाजाचा निरनुनासिक समाजाशी जेव्हा मिलाफ झाला तेव्हा नाकातून अनुनासिक उच्चार करणाऱ्या समाजाचे उच्चार पेद्रू ठरून त्यांच्या शब्दांची व प्रत्ययांची नेमणूक नपुंसकखात्यात झाली व केवळ पुल्लिंगी बोलणाऱ्या समाजाच्या बोलण्यात पुं व नपुं अशी द्विलिंगी भाषा येऊ लागली. संस्कृत पाणिनीय व वैदिक भाषेत नपुंसकलिंगाच्या प्रवेशाची ही अशी हकिकत आहे.