Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
२२ आता विवेचनार्थ अजन्त व हलन्त नपुसकलिंगी शब्द घेऊ, हलन्त शब्दांपैकी स्त्रीवाचक शद्बांना व पुंवाचक शब्दांना एकच प्रत्यय लागतात, म्हणजे हलन्त शब्दात प्रत्ययदृष्ट्या पुंस्त्री हा भेद नाही. गो, रे, मातृपितृ इत्यादी अजन्त शब्दातही प्रत्ययदृष्ट्या लिंभगेद नाही. अजन्त शब्दांत प्रत्ययदृष्ट्या लिंगभेद मागाहून शिरला. तात्पर्य, अत्यंत प्राचीन अशा पूर्ववैदिकभाषात स्त्रीपुं असा लिंगभेद नव्हता. त्याकाली लिंग फक्त दोन होती, एक पुल्लिंग व दुसरे नपुंसकलिंग. नपुंसक या शब्दावरून हे अनुमान दृढ होते. पुं व नपुं असे दोन विभाग अत्यंत प्राचीन आर्यसमाजात मानिले जात. अत्यंत प्राचीन काळी स्त्रीलिंग हा विभाग जर माहीत असता, तर नपुंसक विभागात स्त्रीशब्दांचा समावेश करावा लागता. परंतु तसा समावेश झाल्याचा पुरावा बिलकुल नाही. यावरून दृढ अनुमान होते की, प्राचीन पूर्ववैदिकभाषात पुल्लिंग व नपुंसकलिंग अशी दोन लिगे शब्दांची मानीत असत. पुढे स्त्रीलिंगाची कल्पना प्रचलित झाल्यावर पूर्वीचा नपुंसकलिंग हा रूढ शब्द स्त्रीवाचक हि नव्हे व पुरुषवाचकही नव्हे अशा शब्दांना केवळ संज्ञा म्हणून लाविला जाऊ लागला. नपुंसक या शब्दाऐवजी, खरे पाहता, अस्त्रीपुंसक किंवा नस्त्रीपुंसक असा परिभाषिक शब्द बनवावयास हवा होता. परंतु सार्वत्रिक समयाने वैय्याकरणांनी तो मानिला नाही. एवढे मात्र निश्चित की, प्राचीन पूर्ववैदिकभाषेत पुल्लिंग व नपुंसकलिंग अशी फक्त दोन लिंगे मानीत, पैकी पुल्लिंगाचे व तदनुषंगाने स्त्रीलिंगाचे प्रत्यय येथपर्यंत विवेचिले. आता नपुंसकलिंगाच्या प्रत्ययाचे पृथक्करण करू. पृथक्करणार्थ, काही निवडक शब्दांची रूपे उद्धरितो :
१ २ ३
१ मनस् मनसी मनांसि
२ प्राक् प्राची प्रांची
३ महत् महती महांती
४ ब्रह्म ब्रह्मणी ब्रह्माणि
५ वारि वारिणी वारीणि
६ गुरु गुरुणी गुरूणि
७ कर्तृ कर्तृणी कर्तृणि
८ दंडि दंडिनी दंडीनि
९ कमलं कमले कमलानि
१० कमलं कमली कमलि
११ ददत् ददती ददति, ददन्ति
१२ तस्थिवत् तस्थुषी तस्थिवांसि