Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

तो प्रकार नपुंसकलिंगी शब्दांच्या बाबतीत झालेला दिसत नाही. उदाहरणार्थं, मनस् मनसी मनांसि या तीन रूपांच्या खोडांवर तृतीयादी विभक्त्यांच्या प्रत्ययांची कलमे केलेली आहेत की काय ते पहा. मनोभ्याम् हे द्विवचनी रूप मनसी + भ्याम् यापासून साधलेले नाही, मनस् + भ्याम् यापासून साधलेले आहे. मनोभ्य: हे अनेकवचनी रूप मनांसि + भ्यस यापासून साधलेले नाही, मनस् + भ्यस् यापासून साधिलेले आहे. तात्पर्य, मूळ शब्द च नपुंसकलिंगी तृतीयेपासूनच्या प्रत्ययाच्या पूर्वी अंग म्हणून संमिश्र वैदिकभाषेत धरिलेला आहे. प्रथमेचा व तृतीयादी विभक्तींचा काही एक संबंध नाही. हा असा विजोड का म्हणून उत्पन्न झाला? वचनवाल्यांची संख्यावाचक रूपे, त्यावर प्रत्ययांची कलमे करण्याला, योग्य नाहीत असे संमिश्र समाजाला आढळून आले. योग्य नसण्याचे कारण असे की ज्या कल्पनेने वचनवाल्यांनी आपली तीन रूपे रचिली ती कल्पना विभक्तीवाल्यांच्या प्रथमारचनेच्या कल्पनेहून स्वरूपत: भिन्न होती. विभक्तीवाले एकसंख्यादर्शक स् हा प्रत्यय एकवचन, द्विवचन व त्रिवचन दाखविण्याकरिता अनुक्रमे एकदा, दोनदा व तीनदा लावीत व प्रथमेची तीन रूपे सिद्ध करीत. केवळवचनवाल्यांचा मार्ग याहून भिन्न होता. त्यांनी आपली संख्यादर्शक वचने निराळया कल्पनेवर रचिली. त्यांच्यापाशी त्यांच्याही पूर्वीच्या भाषेतून वचनांचे तीन प्रत्यय आले होते. एकवचनाचा म् प्रत्यय व द्विवचनाचा इ प्रत्यय, म् चा अर्थ एक व इ चा अर्थ दोन. या पूर्वीच्या भाषेत संख्या मोजण्याची मजल एकेकाळी दोनपर्यंतच गेली होती. तीन ही संख्या म् + इ या दोन संख्यांच्या मिळवणीने ते दाखवीत. हे प्रत्यय शब्दाला लावून एकवचनाचा अन्त्य स्वर एकमात्राक ऊर्फ ऱ्हस्व, द्विवचनाचा अन्त्य स्वर द्विमात्राक ऊर्फ दीर्घ व त्रिवचनाच्या प्रत्यया पूर्वील मूळ शब्दाची टि त्रिमात्राक ऊर्फ प्लुत उच्चारीत. हा प्रकार ते कसा करीत त्याची साधनिका देतो. प्रथम उदाहरणार्थ अजन्त शब्द घेतो. नपुंसकलिंगी सर्व अजन्त शब्द त्या भाषेत नित्य, विकल्पाने नव्हे,
अनुनासिक असत. म्हणजे वारि, मधुँ, कर्तृ, असे सानुनासिक उच्चार ती भाषा बोलणारे लोक करीत. प्रथम वारि शब्दाच्या रूपांची साधनिका देतो :

(१) वारिँ + म् = वारिँ = (पाणिनीय) वारि किंवा वारि
* अन्त्य स्वर अनुनासिक असल्यामुळे म् चा लोप, पाणिनीय भाषेत अन्त्य अप्रगृह्य स्वर विकल्पाने अनुनासिक उच्चारीत, सबब दोन रूपे. वारिँतील इँ एकमात्राक ऊर्फ ऱ्हस्व उच्चारावयाची असे.

(२) वारि + इ = वारिँई = वारिणी
* इ द्विमात्राक उच्चारीत, सबब दीर्घ काढिली आहे.अनुनासिकाचा न् होई. र मुळे न् चा ण् झाला.