Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
आता पाणिनीचा सहावा लुङ् पृथक्करणार्थ घेऊ :
मूळ यम्, रम्, छो, नम् असे धातू. त्यांची सन्नन्त अंगें यियँस्, रिरंस्, चिच्छास्, निनंस्, आद्य अक्षरांचा लोप होऊन यंस् रंस्, छास्, नंस् यांना इ व लेट् चा सिप् लागून यंसिष्, रंसिष्, छासिष्, नंसिष्, पुढे लङ् चा अडागम व प्रत्यय, तात्पर्य, पाणीनीचा
पाणिनीचा सहावा लुङ् सेट् पाणिनीचा सातवा लुङ् अनिट् सहावा लुङ् म्हणजे सनन्त धातूंच्या लेट् चा लङ् आहे. मिळून चवथा, पाचवा, सहावा व सातवा लुङ् हे चारी लुङ् पूर्ववैदिक लेट् चे लङ् आहेत.
आता पृथक्करणार्थ पाणिनीचा तिसरा लुङ् घेऊ. हा बोलनाचालून अभ्यस्त आहे. अभ्यस्त असण्याचे कारण असे आहे की णिजन्त अंगाशी यांचा व्यवहार आहे. चुरादि व णिजन्त धातू मूळचे यङ् व यङ्लुक् चे अवशेष आहेत, हे मागे दाखवून दिलेच आहे. हे णिजन्त धातू यङ् व यङलुक् यांच्या स्थितीत असताना यांची परोक्ष म्हणजे भूतकालीन म्हणजे लङ् ची रूपे अभ्यस्त साहजिक असत. पुढे ही परोक्ष भूतकालीन अभ्यस्त रूपे तेवढी पाणिनीय संस्कृतात राहिली आणि अभ्यस्त धातूंचे संक्षेप चुरादि वर्गात साधे व साळसूद म्हणून मोडू लागले. त्यामुळे चुरादि वर्गातील धातूंची लङ् ची रूपे अचूचुरत्, अचीकथत्, अबीभवत् वगैरे अभ्यस्त झालेली पाहून सकृद्दर्शनी अचंबा वाटतो, परंतु या रूपांचा इतिहास व पूर्वपरंपरा कळली म्हणजे अचंब्याचे पर्यवसान समाधानात होते.