Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
व्यंजनात सर्व शब्द या तस्थिवस् शब्दाप्रमाणे सर्वनामस्थान भ व पद अशा विभागाने चालतात. यात स्त्रीलिंगी शब्द पुल्लिंगी शब्दाप्रमाणेच चालतात. स्त्रिलिंगाचे वैभक्तिक निराळे प्रत्यय नाहीत ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. अकारात पुल्लिंगी शब्द व व्यंजनान्त शब्द यांच्या प्रत्ययांची तुलना करू, प्रथमा व द्वितीया यांचे प्रत्यय दोन्ही शब्दांना सारखे स् व म् हे आहेत, त्यात बदल नाही. परस्थानीय प्रत्यय दोन्ही शब्दांना भ्याम्, भिस् व भ्यस् हे सामान्य आहेत, त्यातही बदल नाही. भस्थानीय प्रत्ययात मात्र भेद आहे तो खालील तखत्यात देतो :
आकारान्त व्यंजनान्त
३ x १ स्येन स्या ह्न
४ x १ स्थ स्ये ह्न
५ x १ स्यत् स्यस् ह्न
६ x १ स्य स्यस् =
६ x २ स्योस् स्योस् =
६ x ३ स्याम् स्याम् =
७ x १ स्यि स्यि=
७ x २ स्योस् स्योस् =
७ x ३ स्यु स्यु=
अकारान्त पुंल्लिंगी शब्दांच्या व व्यंजनान्त शब्दांच्या प्रत्ययामध्ये असा भेद का ?भेदाचे कारण एकच संभवते. ते हे की, पूर्ववैदिक आर्यसमाजात एक भाषा केवळ स्वरान्त शब्दांची असे व दुसरी भाषा व्यंजनान्त शब्दांची असे. संस्कृत शब्दाखेरीज करून मराठीत प्राय: प्रत्येक शब्द जसा स्वरान्त असतो. तसा प्रकार प्राय: एका पूर्ववैदिक भाषेचा असे आणि दुसऱ्या पूर्ववैदिक भाषेत प्राय: सर्व शब्द इंग्रजीतल्याप्रमाणे व्यंजनान्त असत. स्वरान्त बोलणाऱ्या समाजाचा व व्यंजनान्त बोलणाऱ्या समाजाचा मिलाफ होऊन वैदिकसमाज बनला.