Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

          १                    २                      ३
१    तस्थुष्                तस्थुषौ           तस्थुष:, तस्थुष्
                              तस्थुष्
२ तस्थुषम्                   ' '                      ' '
३ तस्थुष:                 तस्थुङम्भ्या     तस्थुडि:भ
७ तस्थुषि                 तस्थुषो:          तस्थुटस

तस्थिवत् वाल्यांचे कृदन्त असे चाले :
         १                   २                     ३
१    तस्थिवत्        तस्थिवतौ             तस्थिवत:, तस्थिवत्
                         तस्थिवत्
२ तस्थिवतम्             ' '                            ' '
३ तस्थिवता          तस्थिवद्भ्याम्        तस्थिवद्भि:
७ तस्थिवत:          तस्थिवतो:            तस्थिवत्सु
लिट्पासून झालेल्या कृदन्ताचे पूर्ववैदिक तीन समाजात असे तीन प्रकार असत. हे तीन समाज एकवटल्यावर संमिश्र वैदिकसमाजाने तिन्ही प्रकारातून उच्चाराला सुलभ अशी रूपे निवडून पाणिनीने दिलेली रूपे योजण्याचा प्रघात पाडला. सभा भरवून व कायदा करून प्रघात पाडला असे नव्हे. संमिश्र समाजाच्या बोलण्याच्या घसटीमध्ये ती ती रूपे त्या त्या प्रत्ययामागे लावण्याचा, संमिश्र समाजाच्या स्वभावानुसार व लकबीनुसार सहज ओघाओघाने प्रघात पडला इतकेच. वैय्याकरण व शाब्दिक जेव्हा शब्दविचार व रूपविचार करू लागले तेव्हा एकाच शब्दाच्या २१ रूपात तीन भेद दिसतात असे त्यांच्या लक्षात आले. त्याकाळी त्या भेदांचे कारण पहाण्याकडे कल नव्हता. वर्तमानकाळी कारण शोधण्याकडे लक्ष असल्यामुळे, आपण या भेदांचे कारण देण्याचा यत्न करतो. या तीन समाजांच्या भाषेतील रूपांची वाटणी एकविसांपैकी कोणकोणत्या स्थळी झाली ते पहाण्यासारखे आहे. तस्थिवान्स्वाल्यांना सर्वनामस्थानची पाकच रूपे आली. तस्थुष्वाल्यांच्या वाटणीस सबंद भ म्हणजे स्वराने किंवा य ने ज्या प्रत्ययांचा प्रारंभ होतो तत्प्रत्ययान्त रूपे आली आणि तस्थिवत्वाल्यांच्या हिश्शास सबंद पद म्हणजे व्यंजनाने ज्याचा प्रारंभ होतो तत्प्रत्ययात रूपे आली. ही त्रिविध वाटणी अगदी सार्वत्रिक आहे. वाटणीचे कारण दुसरे तिसरे काही गूढ नसून फक्त उच्चारसौकर्य हे आहे. स्वरांनी व य ने ज्यांचा प्रारंभ होतो त्या प्रत्ययाच्या मानगुटीस तस्थुष् हे अंग बेश बसते म्हणून भ चा प्रांत तस्थुष् या अंगाने बनला. व्यंजनादी प्रत्ययांच्या खांद्यावर तस्थिवत् हे अंग नामी बसते म्हणून पद चा प्रांत तस्थिवत् या अंगाने व्यापिला आणि बाकी राहिलेल्या सर्वनामस्थानी टोलेजंग तस्थिवान्स् या अंगाची स्थापना झाली. ही वाटणी का झाली हे कळले म्हणजे मग द्वितीयेच्या द्विवचनानंतर तस्थिवान्स् शब्द द्वितीयेच्या अनेकवचनी तस्थिवान्स् हे बडे रूप सोडून एकदम तस्थुष: हे नमते रूप का धारण करतो व तृतीयेच्या द्विवचनाला पोहोचला असता ताटकन् तस्थिवद् हे तिसरे सोंग का घेतो या चमत्कारांचे इंगित कळते. या सोंगाचे खरे गुह्य पाणिनीला कळले नसल्यामुळे तस्थिवस् शब्दापासून तस्थुष् शब्द संप्रसारणाने व इलोपाने त्याने सिद्ध केला आणि तस्थिवत् शब्द स् स्थानी आणून व अन् चा लोप करून बनविला. वस्तुत: तिन्ही एकवटणारे समाज सवंश्य होते. एक समाज तस्थ् या अंगाला उष् प्रत्यय लावी, दुसरा इवान्स् प्रत्यय लावी आणि तिसरा स् चा सवर्ण जो त्याचा त् स्वीकार करून इवत् प्रत्यय लावी.