Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

११ आता देव शब्दाप्रमाणे तस्थिवांस् किंवा तस्थिवान्स्, तस्थुष् व तस्थिवत् या तीन शब्दांच्या रूपांच्या मिसळीने जी रूपावली वैदिककाली व विशेषत: पाणिनीयकाली बनली तिची साघनिका देतो. सर्वनामस्थानी तस्थिवान्स्, भस्थानी तस्थुष् व पदस्थानी तस्थिवत् ही अंगे धरून साधनिका होते, हे लक्षात ठेवणे अवश्य आहे.

(१) तस्थिवांस् + स् = तस्थिवान्सस् = (दोन्ही स् चा लोप होऊन) तस्थिवान्
* पाणिनी तस्थिवत् असा मूळ शब्द धरतो व अंत्याला दीर्घत्व व नुमागम करून तस्थिवान्स् हे अंग तयार करतो. तस्थिवांस किंवा तस्थिवान्स् असा उच्चार काही काल होऊन, नंतर स् चा लोप होऊन तस्थिवान् हे रूप वैदिककाली झाले.

(२) तस्थिवांस् + स् + स् = तस्थिवांस् + अ +उ = तस्थिवांसौ.
* अ + उ यांचा संधी अउ म्हणजे औ असा पूर्वी वैदिककाली होत असे. एतत्संबंध विवेचन 'वृद्धि व गुण' या निबंधात सविस्तर केले आहे.

(३) तस्थिवांस् + स् + स् + स = तस्थिवांस् + अ +:+:= तस्थिवांस्:

(४) तस्थिवांस् + अम् = तस्थिवांसम्
* अकारान्त शब्दापुढे म् प्रत्यय व अकारान्तेतर शब्दांपुढे अम् प्रत्यय, पाणिनी अम् प्रत्यय मूळ धरतो व अकारात शब्दाच्या टि चा लोप करून देवं हे रूप साधितो.