Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
तिघांचा मिलाफ झाल्यावर संमिश्र समाजाने उच्चाराला सुकर अशी रूपे तेवढी ठेविली आणि बाकीच्यांना रजा दिली. संमिश्र समाजाने म्हणजे वैदिकसमाजाने प्रथमेचे देवा: हे रूप ठेविले, द्वितीयेचे देवान् हे रूप ठेविले, तृतीयेचे देवेभि: हे रूप ठेवून शिवाय त्याहून सुलभ असे देवै: हे नवे रूप घडविले, चतुर्थीचे देवेभ्य: रूप पसंत केले आणि षष्ठी व सप्तमी यांची देवानाम् व देवेषु ही रूपे घेतली. ही रूपे पसंत करण्यात उच्चारसौलभ्याकडे जशी दृष्टी होती तशीच अनेक विभक्त्यांत एकाच उच्चाराची जी रूपे होती त्यांनाही वगळण्यात आले. भ्याम्च्या पाठीमागे देवा हे रूप का आणि भ्यस्च्या पाठीमागे देवे हे रूप की, देवान् या द्वितीयेच्या व देवानाम् या षष्ठीच्या रूपात न अकस्मात् काय म्हणून घुसला इत्यादी शंकांचे निवारण वरील पृथक्करणाने व अर्थनिवेशनाने होते. नाही तर पाणिनीच्याप्रमाणे कोरडी कारणे देऊन समाधान मानावे लागते. भ्याम्च्या पाठीमागे अंगाला दीर्घत्व येते, भ्यस्च्या मागे अंगाचा एकार होतो, षष्ठीच्या अनेकवचनी नुमागम होतो आणि द्वितीया अनेकवचनी अस् प्रत्ययाच्याऐवजी आन् प्रत्यय येतो, अशीकाही तरी समजूत करून घ्यावी लागते. पाणिनीची परिभाषा
एकीकडे सारिली म्हणजे, कित्येक प्रत्ययामागे देव शब्दाचे देवा असे रूप होते व कित्येक प्रत्ययामागे देव शब्दाचे देवा असे रूप होते व कित्येक प्रत्ययांमागे देव असेच रूप रहाते एवढेच पाणिनी सांगतो हे उघड दिसते. एका देव शब्दाची देवा: देवान्,
देवानाम्, देवेभ्य: अशी आकारी नकारी व एकारी रूपे होतात एवढेच पाणिनी सांगतो. परंतु या कोरड्या सांगण्याने समाधान होत नाही. ही भिन्न रूपे योजिणारे भिन्न समाज
होते, देव हा एकच शद्ब ते निरनिराळया तऱ्हांनी चालवीत व या भिन्न समाजांचा
मिलाफ होऊन प्रत्येक भाषेतील उच्चारसुलभ रूपे संमिश्र वैदिकभाषेत राहिली इत्यादी
परंपरा कळली म्हणजे जे समाधान होते ते असे आहे एवढया कोरड्या सांगण्याने होत
नाही.