Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
(१६) देव + स् = देवह् = देवअ ३
* संबोधन म्हणजे दूराद् आव्हान. ते असताना अंत्य स्वर प्लुत होतो. ह् चा सवर्ण अ होऊन देवअअअ असे रूप झाले, स् चा लोप होतो म्हणून पाणिनी सांगतो. तसा प्रकार नसून, तीन स् चे तीन अ होऊन संबोधनी त्रिमात्राक प्लुत अ होतो.
९ वरील पृथक्करणाचा आता समाजदृष्टया अर्थ करू. अर्थ करण्याला सुलभ जावे म्हणून देव या शब्दांची जुनाट आर्यभाषेत, वैदिकभाषेत व पाणिनीय भाषेत आठही विभक्त्यांत एकंदर जी रूपे सांपडली ती सर्व एके ठिकाणी नमूद करतो.
एक द्वि. त्रि.
१ देव: देवौ, देवा देवा:, देवास:, देवे, देवाँ:
२ देवम् देवौ, देवा देवान्
३ देवेन् (देवया) देवाभ्याम् देवेभि:, देवै:
४ देवाय देवाभ्याम् देवेभ्य:, देवे
५ देवात् ' ' '' देवे
६ देवस्य देवयो: देवानाम्
७ देवे देवा ' ' देवेषु
८ देव ३ देवौ ३ देवा: ३ इ.इ.इ.
एकवचनात आठही विभक्त्यांत देव हे एकच रूप आहे. द्विवचनात देवौ व देवा अशी दोन रूपे आहेत. म्हणजे वैदिककाली ही दोन्ही रूपे बोलण्यात येत व दोन्ही रूपे शिष्ट समजली जात. त्यातल्या त्यात देवा हे रूप जुनाट समजत. अर्थ नीट उलगडण्याकरिता मराठीतील एक-दोन उदाहरणे घेऊ. शिष्ट मराठीत माणसे असे रूप येते. परंतु कोंकणातील बालूच्या मराठीत माणसाँ असे रूप येते, याचा अर्थ असा की, ही दोन रूपे योजणारे समाज शिष्ट व अशिष्ट असे दोन आहेत. समजा की, शिष्ट मराठीत माणसे व माणसा ही दोन्ही रूपे प्रचलित आहेत. तर त्यापासून असा बोध होईल की, ही दोन भिन्न रूपे योजणारे दोन समाज एकवटून गेले असून दोन्ही समाज पायरीवर आहेत व दोघांना शिष्ट ही संज्ञा आहे. हाच प्रकार वैदिककाली झाला. देवौ बोलणारा एक समाज होता व देवा बोलणारा दुसरा आर्य समाज होता.