Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
(३०)
श्लोक
तयानंतरें दुर्गठाकूर आला । महाराष्ट्रभाषा च बो लों निवाला ॥
म्हणे शाहबा कल्पवृक्षा उदारा । कवी थोर हा यास भाषा आपरा ॥
महाराष्ट्रभाषेन यांचा सवाया । मला देववा लोक उल्लासवाया ॥
मनातील ही अर्ज आभासवाया । कवी हा सवाया करी हांसवाया ॥
यथा ।
साहेबजी मज देवविलें प्रतिमासेक पावेक होन हो भीसें ।
ते पडताहेत साठेक न्यारि तें फार परंतु महत्व न दीसे ॥
दे मज एक नवा जिन वाजि नवाजिलेंसे खलकांत दिसे ।
जंबुद्विपाधिपअवूदसा निजतंबुपुढें जो दणाणित हिंसे ॥६७॥
तया नंतर पालकी आणि बाजी । तया लागि देऊन राजा नवाजी ॥
म्हणे तो मला एक आणीक द्यावें । जयानें जगीं कल्पपर्यंत ज्यावें ॥
छंद सत्तावीस यें दिव्यरत्नें । बाराभाषायुक्त तुझ्या गुणानें ॥
ऐसी माला या कवीनें करावी । ते म्या माझे कंठदेशीं धरावी ॥
कवी लागि त्या प्रेरिलें तैं नृपानें । स्वहस्तें पटी दीधली खास पानें ॥
प्रसंगी पुढें जें जसे होत गेलें । महाराष्ट्रभाषासवायें च केले ॥
(३१)
ओवी
रणी वैरीयांचा कुंजर । चालोनि आला पर्वतपरी थोर ॥
रायें त्याचे तोडिले शीर । तरवारेने येक धाये॥
यथा ।
मेरुचिं ही शिखरें (पाडि) अवलीलनें जो निजदंतउक्यानें ।
तो अरिवारण त्वा तरवारेनें तोडिला हाणोन एक धक्यानें ॥
मुंड तुटोन पडे पर तें धड भडभड रक्त वमे भभक्यानें ।
ततकाल वेताल तें ने हो कसा कीं जसा मुखमुक्तमसक्का कसक्यानें ॥६८॥