Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१७४]                                        ।। श्री ।।                २८ एप्रिल १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासिः-

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. अबदालीमुळे मुलकांत दंगा फार. फौज मातबर आली ह्मणजे दबावानें जाईल; अथवा राहीला तर मातबर झुंज होईल. पन्नास हजार फौजेनिसी जलदीनें मदत जाहाली पाहिजे. ह्यणजे इकडीलहि बंदोबस्त राहील ह्मणोन पत्र लिहिलें. तें कळलें. ऐशियास, अबदाली हावभरी जाहले आहेत. यामुळें फौजानें आव टाकला. त्यास, सांप्रत आह्मी सीहारास२६२ आलों. मातबर फौज व गाडदी२६३ व तोफखाना बरोबर आहे. इकडील बुंधेले व संस्थानिक सर्व बरोबर जमा करून नरवरच्या सुमारें येतों. पुढें जिकडे सोई तिकडे जाऊं. माधोसिंग व बीजेशिंग व कोटेवाले राणाजी यांस सर्वास पत्रें, वकील, पाठविले आहेत. सर्व इकडील तिकडील दोहीं राजकारणांवर आहेत. परंतु आमचे येण्यामुळें एक पक्ष धरून सर्व जमा होतील. याच प्रकारें त्यांसहिं लिहिलें असे. हे सर्व एक होऊन मल्हारबा, जाट यांसहित अबदालीचें पारपत्य करावें हाच विचार आहे. त्यास, तुह्मीं तिकडील बंदोबस्त उत्तम प्रकारें राखून तुह्मीं हुजूर यावें. हिंदुपत, खेतासिंग, तिकडील धुमे चांगले माणूस सर्वहि जे उपयोगी ते जमा करून आणावें. त्यास, तुह्मांस तिकडील दत्तियाचे पेंचामुळें इकडे यावयास फावलेना२६४, तर तिकडील बंदोबस्त उत्तम प्रकारें राखणें. आण तुह्मीं आपले तरफेनें शहाणा कारकून मातबर हिंदुपतीकडे पाठवून त्यास फौजसुद्धा सत्वर हुजूर लावून देणें. वरचेवरी तिकडील वर्तमान लिहीत जाणें. जाणिजे. रवाना छ ११ रमजान. हे विनंति.