Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१७६]                                        ।। श्री ।।                २८ एप्रिल १७६०.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासिः-

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. लढाईचा मोकदमा२६६ आहे. याकरितां सरकारांत प्याद्याचें प्रयोजन आहे. तरी तुह्मीं चांगला प्यादा मर्द माणूस याप्रे॥ ३००० तीन हजार सत्वर हुजूर पाठविणें. एक महिना प्याद्यास तेथें खर्चावयास देऊन रवाना करणें. बराबर कारकून देणें. येथें आलियावरी माणूस पाहून करार केले जातील. तरी प्यादे दिरंग न लावितां पाठवून देणें. माणूस केवळ कमाविसदारी तहसीलच्या कामाचें असें न ठेवणे. चांगलें मर्द झुंजाचे उपयोगी पडे याप्रे॥ तलाश करून ठेवून पाठविणें. + जाणिजे. छ ११ रमजान, सु।। सितैन मय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणें. वहिली व सागरपैकी हजार पाठवणें, ऐसी पत्रें येथून पाठविलीं आहेत. तोफखानासुद्धां भारी जमावानें लढाई करावी लागते. बाहेरील कुमकेयाचा भरंवसाच आहे. सुजादौला, फरुकाबादवाले अनुकूल होत असें राजकारणहि करणें. हिंदूपत वगैरे बुंधेले जलद येत व चांगले प्यादे सागर, रहिली वगैरे तुमचे आढळाचे, अंतरवेदींतील चव्हाण, आडारु वगैरे चांगले लोक प्यादे दोन तीन हजार पाऊण महिना पंधरा रोजांत येऊन पावतेसें करणें. तिकडे शह असल्यास तुह्मांस राहावें लागेल. शहाणें आहां. कांहीं फौज व नवे प्यादे ठेवून सत्वर पाठवणें. ऐवजविसीं प्रकार पेशजी लिहिला, तों अलीकडे तुमचीं पत्रें येतात त्यांत खराबीच लिहिली येती. असो. गारा वगैरे सर्व आफत असली तरी दाहा वीस लाखांची तरतूद जरूर कर्ज अगर मामलतचे ऐवजी मिळोन सत्वर करणें. गैरहंगाम येणें. शत्रू प्रबल. बाहेरील ऐवज तूर्त कोठें आहे ? यास्तव जरूर तरतूद करणें. तपशील लेहून न पाठवणें. कामाचे प्रसंगी जो तरतूद करील ते कामावर पडेल. हे विनंति पे॥ छ ९ सवाल.