Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

दरवाजांस जाऊन लागले तेव्हां शिवाजी राजे आपल्या जवळील थोडे लोकांनिशीं बाहेरी निघून अपल्या अंगकडून महायुत्धकरून फौज तमाम मारून कहाडून अल्या दोघे सरदारांपैकीं मुसेखानास हीं मारून टाकिले । फत्तेखान पळून गेला । त्या बरोबरी त्याची फौज हीं गेली । त्या उपरी शिवाजी राजे बाहेर निघून सेना सन्नत्ध करून अल्लियदल्शाहावरी जाणेस सित्ध जाहले । इतकियांत शिरोबल दुर्ग साधून भीम सेनापति हीं येऊन पावले । अैसे असतां चित्रकल्ल दुर्गाचें राज्य करणार विच्चकती भरमा ह्मण्णार मोठा शूर त्याची सेनासमीप रहावयाचें स्वार उजव्या बाजूस तीनी हजार स्वार त्याचे तरवारीस मेणसव्याचें डाव्या बाजूस तीने हजार स्वार त्याचें तरवारास मेणरुणाचें त्या खेरीज माघे पुढील जिलेबचे वेगलेच या खेरीज चित्रकल्ला दुर्गाचें प्यांद फार जबरदस्त तैसे प्यादेही त्याकडे फार । या सन्नहा निशी त्यानें सर्वदा अल्लियदल्शाहाचा मुलूख व विजापूरची पेट देखील मारून लुटून घेऊन जाणें अैसें बहूतदा करति आला । तो त्या किल्यास ही पहिल्या प्रमाणेंच जाऊन विजापुरची पेट लुटून गेला । तेव्हां अल्लियदलशाहानी तजवीज केली जे. दक्षिणेकडे ब्यंगळूरास मुस्तपखानास पाठविले ते जे करिताती परंतु संभाजी राजे स्ववशास यावयाचे दिसत नाहीं । चित्रकल्लदुर्गाचा भरमा विजापूरची पेट देखील मारून लुटून घेऊन जातो । पुने प्रांतास मुसेखान व फत्तेखानास पाठविल्यापैकीं शिवाजी राजानी मुसेखानास मारून टाकिलें । फत्तेखान् सर्वस्व हीं गमाऊन जिवानिशी येऊन पावला । आतां शिवाजी राजे फौज तयार करून. विजापूरावरि चाले करावयास सिद्ध, जाहले आहेत । शिवाजी राजे वरप्रसादी आणी शूर हीं, कोठ गेल्या ही। जयच पावणार, तशानी चाले करून आल्यावरी विजापुरचा विचार ही संशयांत आहे । करितां यास मुख्य योचना करून शाहजी राजास कबूल देऊन, मोकळ करून यांकडून हे राजकारण येकंदर थोपाव ह्मणवून,