Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

त्यास बलाऊन येकांती सांगीतले जे अमुचे वडील शाहाजीराजे परमशूर आणी योगवंतहीं, त्यांनी केली कामें हीं निर्मल मन कडून केले; परंतु त्यांत थोडा भाव सुचते।, ते काय ह्मणीजे प्रथम निजामशाहा संगतीस होते, ते अल्लियदल् शाहाचे बोधने वरून त्यांकडे आले परतून निजामशहानी बलावितांच याकडे गेले पुन्हां अल्लियदल् शाहाकडेहीं आले अैशा दोन तीन् येरधारा जाहल्या । तशाचे संगतीस जितके दिवस होते कीं त्या त्याची कामें निर्वचन कडून करूनहीं त्यां त्यांस यांचे ठांई कपटच भासावया जोग जाहलें; परंतु अपले म्हणून विश्वास धरावयास ठाव नाहींस जाहलें । त्यां त्यांना कार्य करण्यावांचून सरनीते कार्यास यांस आपले करून घेऊन कार्य शेखर करून तदनुसार मान बहूमान केले। येवढेंच परंतू मन कडून हे आपलें ह्मणून मानावयाजोगी करणी वडीलांकडून घडली नाहीं। ते कैशी ह्मणजे थोर मनुष्यानी येकाची संगती धरिल्यावरी त्याशी विगडताच नयें । कदाचित् विगडावयाजोगें परतून त्यांशी मिळू नये । हे तों प्रसिद्धनीती असतां या रीती चालून बोले इतिकी; यांसहीं वडील अंगकडून शूर आणी निर्वचनेकडून वर्तल्याकरितां कृत्रिमि यवनापासून वडीलांस ईश्वर राखिले । अह्मी प्रयासान घेतलें सिंव्हगडहीं, व आपण बहूत प्रयास करून संपादिलें ब्यंगळूर हीं यवनास सोडून देऊन सात-यांत येऊन राहिले । आतां त्यास वृत्धाप्यदशाहीं आली। या उपरी अह्मास सुचल्या बुत्धीन सारजावें । अल्लियदल्शाहाकडें वडीलानी अनेक प्रयास केले तरीहीं त्यांचे चित्तांत अह्मी जड जाहलों । अम्हास तोडावे म्हणूनच आहे । तसेंच निजामशाहाचें राज्य बांधून घेऊन दे. वगिरी दुर्गांत आहे,त्या अवरंगजबासही अम्ही येक शल्य होऊन अहों । अम्हास ताडावें म्हणावयाचेंच आहे हे दोन प्रबल शत्रुमधें अम्ही पुरंदर गडांत असून राज्य करावें म्हणिजे अम्हास कदापि चालणार नाहीं । येखादे वेळेस दगा करून अम्हास बुडवितील । याकरितां अम्ही बाहेर निघून या दोघांसहीं अवरावें तेव्हांच अमचा टिकावा होईल।