Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

त्याच्या घोड्याची बिरुदें ताजवस जाव जोडे ही तीनी बिरुदें ही काहडून घेऊन, त्याचि फौजही कित्तेक लुटून घेऊन, राजे विजापुरासी पाऊन अलियदलशाहा समोर भरम्याच डोसक व त्याच्या घोड्याची बिरुदें तीनीही ठेऊन खुरनिशि केले। तेव्हां अल्लियदल्शाहा अत्यंत संतोष पाऊन त्यानी आणिली बिरुदें त्यांसच देऊन अपल्या सकळ बिरुदानिशी भरलीसदर, शाहाजी राजास बकशीस केले। सदर बकशीस केल्यांत शाहाजी राजास लाभली वस्तुही खामखमली डेराजिले वाचा तास नगारा येकट सदरेचा हिरवा मखमली चांदनी सोन्याचे कलशासहीत सोन्यारुप्याचे अंबा-या हत्तीसहित जिलेबेचे सदरेंतील नंगी संशरवाले बाक्षाईचे बाजूचे विच्चाकत्तीचे भरम्यास मारून घेतली घोड्याची बिरुदें नव्हतां बाछाईचे सदरेंतील जिलेबेचे घोड्याची बिरुदें घोड्या सहीत ताज वस ज्याचा हुंमा देखील मोहिमरतवे चंद्रसूर्य वाद्ये सोन्या रुप्याची चार खणी डेरा हिरव्या मखमालीची सदरेचा थोर्ला व पत्रा पडदे जगाली त्याच रेशमी तमवे त्या डे-याचे पांय त्याचडते ठांईचा चांदणी हिरवी मखमली व त्याच हिरेजडीत याचे कलश देखील रेशमी तिवाशा व तक्त खांसजीच्या पांयांचा त्यावरी घालावयाच्या सुजण्या देखील व डेराखालील सुरतन त्याच उंठ व हिरव्या सखलातीचे निशानाचे हती व सुया रुष्याचे मोलाम्याचे पाखराव दांतास लाविल्यास निना हिरवे मखमलीचे शेरे माशे सहीत पा-याचे हत्ती इतुक्या सन्नाहानिशी भरलीसदर बकशीस केले । ते समग्रहीं शाहाजी पावले । शाहाजी राजे तो बहूत मान समग्र पाऊन अल्लियदल्शाहाचा निरोप घेऊन सकळ बिरुदें विशेष संपदेनिशी साता-यास आपले संसारांत पाऊन सुखी राहिले । आतां शिवाजी राजाची प्रख्यातता झाल्याचा विस्तार जाणवितों.। अपुले वडील शाहाजी राजे यानीं अल्लियदल्शहापासून मोकळीक होणेस्तव लाभलें राज्य देखील सोडून सातारांत येऊन राहिल्यावरी शिवाजी राजे पुरंदर गडांत होते । त्यांनी आपला मंत्री सुवर्ण नामक ब्राम्हण त्यास सोनाजीपंत ह्मणऊन येक,