Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

इंगवळे, नारदिवे, बोधळे, बरूगर, इंसाफ, आहारकर, अवारे, दुन, मोताटे, तगट, लगड, कल्याणकर, टोंवर, शंकर, बाळके, येणेंप्रमाणे तमाम म-हाटे सरदार शाहजी राजासी मिळाले । तेणें कडून शाहजि राजाची दौलत अधीक वाहडली । हे वर्तमान दिल्लेश्वरास पाऊन, त्यास केलीतजवीज येणेंप्रमाण होणेस मुख्य कारण अल्लीयदल्शहास आम्ही पळविल्या करितां जाहलें । यास्तव आतां अल्लीयदल्शाह अम्ही येकमत होऊन, शहाजी राजास उण करावें, म्हणऊन, दिल्लेश्वर अैसे अवरंगजबानी तजवीज करून, अल्लीयदल्शहास संविधान करून, येक होऊन उभयतांहीं शाहाजी राजासी युत्ध योजून. भीवरातीरी येऊन उतरले. तेव्हां शाहाजी राजानी तमाम यवनास मारून निर्नाम करितों, ह्मणून तीना वर्ष युत्ध केले । तेव्हां शाहाजी राजाचें आराध्य दैवत स्वप्नांत येऊन, तुजकडून यवनाचा नाश होत नाहीं, ते कारण पुढें कितेक दिवसानंतर, तुझे लेंकाकडून होणार, करितां अतां यवनासीं सिंधी करून, घेणे, म्हणउन आज्ञापिले । त्या ईश्वरवचनाचा अंगिकार करून, शाहाजी राजानी,"नूतन निजामशहाची मुलूक आपण बांधिला, ती समग्र दिल्लेश्वर अवरंगजब व विजापूरचे अल्लियदल्शाहा उभयतांस वांटून देऊन सांडून, अपण अपल्या स्वराज्य सातारगड नगरांतच राहिले। उपरी कित्तेक दिवसानंतर अवरंगजबास व अल्लियदल्शाहास हीं वि. रोध पडला । तेव्हां अल्लियदल्शाहानी शाहाजी राजे आपले वडील इराभईम्ंखानाचे स्नेहित, आणि शूर हीं जाहल्या करितां, आतां ही त्याचा स्नेह राखावा म्हणून, शाहाजी राजास बलाऊन पाठवून, बोलून, अपल्याकडील सरदार रणदुल्लाखान् ह्मण्णारास बरोबरी देऊन, दक्षिणप्रांतचे राज्य वैगेर अवरंगजबास तोफा देणार समसास स्वाधीन करणें, ह्मणून पाठविले । शाहजी राजे तेणे प्रमाणें निघुन दक्षिणप्रांतचे राजे लोकांस जिंतले । नावनिशाः-विदूपुरचा राजा वीरभद्र; कोंगदेशिचा राजा कोंगनायक; कावेरीपट्टणाचा राजा जगदेव;