Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

उदंड उपचार करून, अणखी अपल्यास तजवीज करणें आहे, करितां दाहा पंधरा दिवसाच कामास आपण येथेंच उतरावे ह्मणाले । येणेंप्रमाणेंच शाहाजी राजानी यासमीपच स्थलांत आपले डेरे देऊन उतरले । मुस्तपखानानें शाहाजी राजास पत्यारा होइसे स्नेह नित्य नूतन वाहडवीत आला । परंतू राजे यास विश्वासले नाहीत। बाहेरंगांस अपल कपट राजास कळलें नाही ह्मणून, मुस्तपखानास भासावें यांनुसार होतें । तेव्हां हीं राजाचे डेरांत अपशकून चिन्हेंच उदंड दिसूं आलीं । त्यावरून ते स्थळ त्यागून, राजानी आपल्या दुर्गात येऊन पावले । देव प्राबल्यास्तव येथेंच राहिले । तेव्हां मुस्तपखानानें येके दिवशी रात्री, आपल्या बरोबरी आल्या सरदारास शाहाजी राजाचा डेरा घेरून घेणेस निरोपून, आपण हीं त्याच्या पाठीराखा होऊन । शाहाजी राजास हे सूचना कल्ली नव्हती, करितां आपल्या सरदारानीशी डेरांत सुख करीत होते । येकायेकी अर्धरात्रीं डेरास सरदार लोकानी येऊन घेऊन घेतलें । वर्तमान राजाकडील सरदारानीं राजास उठऊन सांगीतले । तेव्हा राजे हुषार होऊन, घोड्यावरी स्वारी होऊन, आपले सरदारांनिशी युत्धाभिमुख होऊन. युत्ध केले । तेव्हां बहूत लोकास जायां करून फार वेळ युत्ध केले । शेवट खान मजकूराकडील सरदार बाजीरायांसी युत्ध करिताना, बाजीरायांचा हात चालवून शाहाजी राजे जखमी होऊन घोड्याखाले मर्च्छागत जाहले। सवेंचि बाजीराजे व मुस्तपखानही शाहजी राजाजवळ येऊन राजास अनेक उपच्यारानें मूर्च्छा सावध करून जखमहीं बाधून राजास अंबारींत बसऊन विजापूरांस अल्लियदलशाहाकडें पाठविले । शाहाजी राजाचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे ब्यंगळूरी होते । त्यांस मुस्तपखानानें केलें कृत्रम व शाहाजी राजास विजापूरास पाठविलें वर्तमान साद्यंत कळून संभाजी राजे मुस्तपखानाशी युत्धास तयार झाले । इतक्यांत मुस्तपखानानें ब्यंगळूर किला साधावयाचें तात्पर्येंकडून युत्धास आला।