Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

दृढ योचना करून शाहाजी राजास कैदेंतून मोकळ करून भेटीस बलावून शाहा मजकूरानीं ह्मणाले । राजे हो तुम्हास व अमचे वडील इभराईमखानास हीं बहुता दिवसापासून स्नेह, तुह्माकडून इभराईमखानास हीं उदंड काम जाहली, इभराइमखानानीं तुह्मास बहुत उपकार केले । प्रस्तुत आह्मिहीं तुह्मास तसेंच चालविलें तुह्मास दक्षिण प्रांतास अह्मी पाठविल्यास तुह्मी सांगीतल्याप्रमाणें काम मात्र केलें । परंतु तुह्मी अह्मापाशी न येतां ब्यंगळूर जाहगीर तुम्हास दिल्याकरितां संसारही आणऊन तुम्ही तेथेंच राहून गेलां; तुह्मी अह्याजवळी असावें ह्मणून तुम्हास बलावणेस्तव मुस्तपखानास पाठविलो; त्यानीं वेघळयाच रीतीनें तुम्हास पाठविले असो । अतां ते कोपातें मनीं धरूनका। आतांही तुह्मा अह्मास संधी हेच कीं, तुमचे पुत्र शिवाजीराजे यानी, अमुचे सिंव्हगड घेतले आहेत. ते गड अमुचे अम्हास सोडून द्यावे । तुमचे ज्येष्ट पुत्र संभाजीराजे ब्यंगळूरांत असून मुस्तपखानाशी भांडताती, त्यास व तुमचे संसारासहीं सातारासी बलाऊन घेऊन ब्यंगळूर सोडून द्यावें । तिसर, चित्रगलदुर्गाचा भरमा फार लबाडाकरितो । त्यावरी मोहीम करून त्याला स्ववशास आणावें म्हणाले । या तीनी गोष्टीसहीं शाहाजीराजानी अंगिकार करून, उभयता पुत्रास लिहून पाठऊन. सिंहगडहीं सोडविले व संभाजीराजे व येकोजी राजे उभयतां संसारसहीत साता-यांत येऊन राहणें म्हणऊन ब्यंगळूरहीं सोडून दिल्हे । आपणहीं फौज तयार करून भरम्यावर चाले करून गेले । शाहाजी राजे चित्रगला पावले. तेव्हां भरमा बागामधें माशाचि शिकारी खेळत होता । त्याला त्याकडील लोकानी अलियदल्शाहानी फौज पाठविले आहेत. त्याफौजेंत शाहाजी राजे येताहेत म्हणऊन सांगितले । तेव्हां भरमा अपुला बिरुदाचा घोडा आण ऊन खार होऊन, वरी लिहिल्याप्रमाणें सन्नाहही बरोबरी घेऊन, युत्धास आला । शाहाजी राजानीं त्यासी चांगले युद्ध करून आपले हातानेंच त्याला मारून भरम्याचें डोसकें कापून रूमालांत बांधून घेतलें ।