Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

त्यांचे लेक शूर होऊन बाक्षाही मुलूक बांधीत बसले आहेत, पहिले पासूनच शाहजी राजे शूर, आतां त्यांचे पुत्रही शूरच जाहल्याकरितां, शाहजी राजे चढून गेले आहेत म्हणावयाच्या वैशम्यानें, कपट कडून शाहजी राजांस धरून कैद करावें ह्मणावयांची योचना करून, मुस्तफखान नाम सरदार मोठा कपटज्ञ, त्याला पाटवणेचा निश्चय करून, त्याबरोबरा दिलावरखान्; फरीदखान्; हैबती राजाचा लेंक बल्लाळ राजा; मस्दखान; अज्जमखान्; सजारखान; राघवराजे म-हाटे; यादुहखान; बाजीराजे । म-हाटे; अंबरखान; वेदाजी भास्कर ब्राम्हण ; जोहरखान कण्णरचा प्रतिनाम कन्नोळ; या सरदारास बरोबरी देऊन, हरउपाय कडून शाहजी राजास जीत धरून आणावें ह्मणून सांगून. मुस्तफखानास ब्यंगलूर प्रांतास पाठविले । तो मुस्तफखान, ब्यंगलूर प्रांतांस येऊन शाहाजी राजास सांगून पाठविला जे : अल्लियदल्शाहा बादशाहाकडून अन्यत्र कार्याम्तव आज्ञापित होउन मी आलो आहे । त्यास तुम्हासी भेटून तजवीज करून मग कशास प्रवर्तणेस निरोपिले आहेत । करितां अगत्य भेटोस यावें, बोलणें आहे ह्मणून सांगून पाठविला । तेव्हां मुस्तफखानाची कपट योजना शहाजी राजास जाणवली ; तरी ही आम्ही बाछायतीच्या मर्यादेस उणें कां करावें, याच्या कपटानें काय होणे आहे, पाहून घेऊं, ह्मणून येकोजी राजे यास अधिपत्य समग्रहीं दिल्लें होतें, परंतू त्याच वय लहान झाल्याकरितां याचें व दुर्गाच ही संरक्षणास ज्येष्ट पुत्र संभाजी राजास ठेवून आपण समागम घेतले सरदार खंडाजी ह्मणोनी: माना मानाजी ह्मणून : तानाजी ह्मणः बंधूजी भांडवलकर: दशदीत म्हणून; मेघजीत ह्मणून : हे सात ही शूर व आप्त जाहल्याकरितां त्यांस घेऊन मुस्तपखानाचे भेटीस गेले | तेव्हां कित्तेक अपशकूनही जाहले । परंतु त्याची परवा करीनासें जाऊन पावले । तेव्हां मुस्तपखानाने फार मर्यादेन भेटी घेऊन,