Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
पनाळी ठेवून देविच्या आज्ञेप्रमाणें राजगडास जाणे निश्चयेकरून जोहरास आपण राजगडास जातों अमचें सैन्य येथें तुम्हासी समर करील; कदाचित् ऐसें तुजला संमत नसल्यां उभय दळभारही दूरसे उभेकरून आह्मी दोघेही द्वंदयुद्ध करूंसें राजानी सांगून पाठविलें । ते वर्तमानही ऐकूनही न ऐकल्यासें होता । तदनंतरें राजे रात्री प्रहरानंतरे साहाशे वायदळासही तेरी बाजवीत शत्रु समीप मार्गानें चालिले तेव्हां ते शब्द मेघ गर्जना ह्मणून शत्रु समग्र समजले । तेव्हां राजेहीं कठिण मार्ग राणचा पांच गाव भोय क्रमून विशालगडास पावले । त्यानंतरें ... वर्तमान जोहरानें ऐकून आह्मीं घेंरिलें अस्तांही कैसें दगाकरून .... ह्मणून तप्त होऊन महसुद म्हण्णार सेनापतीसमागमें कांहीं सैन्य देऊन ....जास धरणेंस्तव पाठविला । तो महसूद तेथून जातांना मार्गी चिखोलांत बहुत सेना गडून गेलीं । कांहीं सेनेसमवेत गडा समीप पावला । त्या अगोदरी पल्ली वनाचा राजा शेवत श्रींगारपुराचा राजा सूर्य ....जे दोघेहीं जोहराचे निरोपावरून विशालगडी युत्ध करून पराभव पावले ...ते। त्यानी महसूद आले वर्तमान ऐकून त्याची भेट घेऊन तीघेहीं विशाल गडास घेरिले । तेव्हां राजे नीट युत्ध करून स्वसैन्य कडून शत्रूस जिंतून तेथून निघून राजगडास येऊन आपले मातोश्रीस साष्टांग नमकार करून चाल्लें वर्तमान येकंदर सांगून एक दिवस तेथेंचि राहिले ।.... महसूदहीं केवळ अडमान पाऊन प्राणानिशी जोहराकडें पावला । हे वर्तमान दिल्लीश्वराचा मामा शास्ताखान् प्रभृतीनी ऐकून आपले मनो...थ सित्धि विषंई संशई जाहले। ऐसें अस्तां शिवाजीराजे आलोचना क...न त्र्यंबक भास्करास पनाळगड यवनाचे स्वाधीन करून तुह्मी येथें ...णें । त्या गडास प्रतिनिधी अल्लीयदलशाहापासून इतर गड घेउं सकतों।.....नी ठाई युत्ध करणें होईना करितां हा निश्चय समजून शीघ्र येणेसें ....लाऊन पाठविल्यावरूत त्र्यंबक भास्कर राजे आज्ञानुसार गड जोहारा चे स्वाधीन करून