Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

[ ३१ ]                                    श्रीशंकर प्रसन्न.                                        १८ जानेवारी १६७५.

मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुबेदार व कारकून सुबे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दडवत सुहुरसन खमस सबैन व अलफ दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे याणीं वराता सुबे मजकुरावरी दिधल्या. त्यास तुह्मीं काहीं पावले नाहीं, ह्मणोन कळों आलें त्यावरून अजब वाटलें की ऐसे नादान थांडे असतील ।।। तुह्मास समजले असेल कीं याला ऐवज कोठे तरी ऐवज खजाना रसद पाठविलिया मजरा होईल ह्मणत असाल तरी पद्यदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे त्याची मदत व्हावी, पाणी फाटी आदिकरून सामान पावावं, या कामास आरमार बेगीनें पावावे, ते नाहीं पद्यदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील आणि तुह्मी ऐवज न पाववून, आरमार खोळंबून पाडाल । एवढी हरामखोरी तुह्मी कराल आणि रसद पाठवून मजरा करुं ह्मणाल, त्यावरी साहेब रिझतील कीं काय ? हे गोष्ट घडायाची त-ही होय न कळे कीं हबशियानी कांही देऊन आपले तुह्मांला केले असतील । त्याकरितां ऐसी बुद्धी केली असेल । तरी ऐशा चाकरांस ठीकेठीक केले पाहिजेत । ब्राह्मण ह्मणून कोण मुलाहिजा करुं पाहतो ? याउपरि त-ही त्यांला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंती देविला असे तो देवितील तो खजाना रसद पावलियाहून अधिक जाणून तेणेप्रमाणें आदा करणें कीं ते तुमची फिर्याद न करीत व त्याचे पोटास पावोन आरमार घेऊन पद्यदुर्गाचे मदतीस राहात तें करणे. याउपरि बोभाट आलियाउपरि तुमचा मुलाहिजा करणार नाहीं गनीमाचे चाकर, गनीम जालेस, ऐसें जाणून बरा नतीजा तुह्मास पावेल ताकीद असे रवाना छ २ जिल्काद.