Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

[ २८ ]                                    श्रीभवानी शंकर.                                              १९ मे १६७३.

मशरुल अनाम राजश्री जुमलेदारानीं व हवालदारानी व कारकुनानीं दिमत पायगो मुक्काम मौजे हलवर्ण ता । चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे सु ।। अर्बा सबैन व अलफ. कसबे चिपळुणीं साहेबीं लष्कराची बिले केली आणि याउपरि घाटावरी कटक जावे ऐसा मान नाही. ह्मणून एव्हा छावणीस रवाना केले ऐसीयास, चिपळुणी कटकाचा मुक्काम होता याकरिता दाभोळच्या सुबेयांत पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होऊन गेला. व चिपळुणाआसपास विलातील लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरएक बाब लागली. त्याकरितां हाल कांहीं उरला नाही ऐसे असता वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हेही पागेस अधिक बैठी पडली परंतु जरुर जाले त्या करितां कारकुनाकडून व गडोगडीं गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे त्यास, तुह्मीं मनास येसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोंवरी धुदी करुन चाराल, नाहीसे जालें ह्मणजे मग काहीं पडत्या पावसांत मिळणार नाहीं, उपास पडतील, घोडी मरायास लागतील ह्मणजे घोडी तुह्मींच मारिलीं ऐसें होईल, व विलातीस तसवीस देऊं लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुणब्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटें, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसें करु लागलेत ह्मणजे जीं कुणबी घर धरुन जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊं लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. ह्मणजे त्याला ऐसें होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनहि अधिक तुह्मी । ऐसा तळतळाट होईल । तेव्हां रयतीची व घोडियांची सारी बदनामी तुह्मावरी येईल हें तुह्मी बरें जाणून, सिपाही हो अगर पावखलक हो, बहुत यादी धरुन वर्तणूक करणें. कोण्ही पागेस अगर मुलकात गांवोगावं राहिले असाल त्याणीं रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाहीं. आपल्या राहिला जागाहून बाहीर पाय घालाया गरज नाहीं साहेबीं खजानातून वाटणिया पदरीं घातलिया आहेती ज्याला जें पाहिजे, दाणा हो अगर गुरेढोरें वागवीत असाल त्यांस गवत हो, अगर फाटें, भाजीपाले व वरकड विकावया येईल ते, रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावें. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाहीं. व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे ऐसे तजविजीने दाणा रातीब कारकून देत जातील तेणेंप्रमाणेंच घेत जाणे, की उपास न पडतां रोजबरोज खायाला सांपडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसें करणे नसतीच कारकुनासी धसपस कराया, अगर अमकेंच द्या तमकेच द्या ऐसे ह्मणाया, धुदी करुन खासदारकोठींत, कोठारात शिरून लुटाया गरज नाहीं व हाली उनाळ्याला आहे तइसें खलक पागेचे आहेत, खण धरुन राहिले असतील व राहातील, कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील, कोण्ही तबाकूला आगी घेतील, गवत पडिलें आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनास ना आणिता ह्मणजे अविसाच एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली ह्मणजे सारे खण जळोन जातील गवताच्या लहळ्यास कोणीकडून तरी विस्तो जाऊन पडला ह्मणजे सारें गवत व लहळ्या आहेत तितक्या एकेएक जाळों जातील. तेव्हां मग कांहीं कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनांस ताकीद करावी तैसी केली त-ही कांहीं खण कराया एक लाकूड मिळणार नाहीं, एक खण होणार नाही हे तो अवघियाला कळतें. या कारणें, बरी ताकीद करुन, खासेखासे असाल ते हमेषा फिरत जाऊन, रधनें करिता, आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो खण, गवत वांचेल तें करणें ह्मणजे पावसाळा घोडीं वाचलीं. नाही तर मग, घोडीं बांधावीं नलगेत, खायास घालावें नलगे, पागाच बुडाली ।। तुह्मीं निसूर जालेत ।।। ऐसें होईल याकारणें तपशिलें तुह्मांस लिहिलें असे जितके खासे खासे जुमलेवार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोखा तपशिलें ऐकणें, आण हुशार राहाणें. वरचेवरी, रोजाचारोज, खबर घेऊन, ताकीद करुन, येणेप्रमाणें वर्तणूक करितां ज्यापासून अतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल. बदनामी ज्यावर येईल. त्यास - मराठियाची तो इज्जत वाचणार नाहीं, मग रोजगार कैसा ? - खळक समजों जास्ती केल्यावेगळ सोडणार नाही हें बरें ह्मणून वर्तणूक करणें.   छ १२ सफर.