Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

[ २९ ]                               शिवाजी महाराज व इंग्रेज कंपनी यांचा तह.                 १६७४

१. इराणचा पातशाहा व हिंदुस्थानांतील मोगल पादशाहा याचा व इंग्रेजांचा तह जाला त्याचे देशांत इंग्रेजाचा व्यापार चालत आहे.
२. व्यापार माल येईल त्याजवरी जकात घेऊं नये महाराजांचे राज्यांत व्यापार चालावया अडथळा होऊं नये.
३. इंग्रेजाचे शिक्याचे रुपये व मोहोरा व पैसे महाराजाचे राज्यांत चालावे.
४. महाराजाचे मुलकांत दर्याचे काठी इंग्रेजांचीं जाहाजें मोडून फुटून किनारियास लागलीं तर त्यातील माल आमचा आह्मांस द्यावा.

एकूण चार कलमें. पैकी महाराजानी ठराव केला तीं कलमेः-
१. महाराजांचे राज्याच तुह्मी व्यापार करावा.
२. माल येईल जाईल त्याची जकात माफ केली असे.

गैरमजुरा कलमेः-
१. इंग्रेजाचे शिक्क्याचे रुपये व पैसे व मोरा या मुलकात चालणार नाहींत.
१. महाराजाचे मुलकात दर्याचे किनारियास जहाजें मोडून फुटून किनारियास लागल्यास माल देणार नाहीत.