Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ३५ ] श्री. ३० जुलै १६७७.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ४ पिंगल नाम संवत्सरे श्रावण शुद्ध एकादशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति याणीं नागोजीं भोसले मुद्राधारी कोट उटळूर यासी आज्ञा केली ऐसी जे - कोट मजकुरास तटसरनोबत व बारगीर पाहिजे ह्मणून त्याजवरून येणेप्रमाणे सरंजामी करून पाठविले बितपशीलः -
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
एकूण सरनोबत ४ चार व बारगीर सात. यांसी तैनात वराही सततीस पा । रास व वाटणी हुजूर पोतापैकीं होन कावेरीपाक होन ७४ चवराहत्तरी रास पावले असेत ही वजा करणें मजुरा असे. आणि इ ।। पैवस्तीपासून वजा वाटाऊ रीतीप्रा । वजा करून बाकी बेरीज माहे दर माहे आदा करीत जाणें मजुरा असे लेखनसीमा.
मर्यादेयं
विराजते.
सुरू सूद बार