Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

बाळाजी बाजीराव पेशवा याचा व नबाबसाहेब यांचा कटाक्ष बहुत आहे. यामुळें व आणीक कितेका कार्यामुळे नबाबसाहेब यांस फौजेची बहुत जरूरी आहे. तरी स्वामींनीं आपला दुर्गसरंजाम सत्वर पाठविजे. दरिंग करावयाचें कार्य नाहीं यावर महाराज थोर आहेत. आपण वारंवार लिहितों आणि स्वामी चित्तीं धरीत नाहींत. तस्मात् दिसोन आलें जे, आपणास कार्याचें अगत्य नाहीं अगर आमचा व गगाजी सकपाळ यांचा इतबार नसेल तरी साहेबी आपला कोणी जो इतबारी असेल त्यासी पाठविजे. त्यांची व नबाब साहेबांची मुलाजमत करून देऊं आणि त्यांचे मार्फतीनें कार्यभाग केला जाईल सत्वर पाठविजे. लोकांत बदनक्ष होय तें न कीजे नबाब साहेब वारंवार आपलें स्मरण करितात जे, मा। रा। राऊ सत्वर येत तरी उत्तम आहे. यावर महाराज समर्थ आहेत सांप्रत महाराज राजश्री छत्रपति स्वामी यांचीं वस्त्रें व घोडे व हत्ती व जंबूर छ १ रमजानी त्रितीय प्रहरीं नजर गुजराणली व राजश्री पेशवे यांचीं वस्त्रें जवाहीर व एक हत्ती, पाच घोडे व नजर मोहरा सहस्त्र एक छ ५ रमजानीं नजर गुजराणली. आणीक राऊ फतेसिग व रघोजी भोसले यांच्या नजरा आल्या आहेत. गुजरतील व बहिरजी पांढरे छ २४ शाबानीं येऊन नबाब साहेब यांची मुलाजमत केली. दमाजी गायकवाड यांचा वकील येऊन नबाब साहेबास भेटला नबाबसाहेबी नजरबेगखान बक्षी, बहिरोजी पवार, पेशवा आणावयास पाठविले आहेत दमाजी गायकवाड यांनी तीन क्रोड रुपये नजर कबूल केली, आणि मोंगलाईत येतात आणि आपणास तों नबाब साहेब आपण ह्मणून चहातात ऐसें असतां अपूर्व आहे जे, स्वामी चित्ती धरीत नाहीत ! सर्वांविषयी स्वामी समर्थ आहेत उभय राज्यात स्वामींचें नाव थोर आहे. आणि हा समय फिरोन येणार नाहीं. नवा राजा जाला आहे. येथेंही निजामनुमुलूक यामागें सर्व नूतन व्यवहार जाहला आहे या संधींत जो जडला तो अक्षयी जाला.ऐशा समयांत जो नबाबसाहेबांस जो अर्ज जागिरा व मनसबा व मदतखर्च मुलाजमत जालिया कराल तो घडोन येईल. त्यासी अविलंब !! आपाजी व मलकोजी जासूद यांजबरोबर आपला कोणी इतबारी असेल तो, व गंगाजी संकपाळ व खर्चास बितपशील - पेशजी इनायतनामा नबाब थोरले यांचा दरबारखर्च रुपये दोन हजार, व हाली नबाब नासरजंग यांच्या इनायतनामियाचा खर्च रुपये चार हजार, नजर नबाब साहेबांची आपलें स्वरूपात योग्य. व मुत्सद्दियांस वस्त्रें आपला कोणी इतबारी पाठवाल त्याजबरोबर पाठविजे, कीं कार्य सत्वर घडोन ये हा सरंजाम येथें पोहोंचलियानें येथील बंदोबस्त करून राजश्री गोपाळराम व राजश्री शिवराम शामराज व राजश्री राजारामपंत गु ।। कठोराम साउकार इनायतनामा नबाब साहेबांचा घेऊन सेवेसी पोहोंचतील. सांप्रत थोरले नबाब साहेब यांचा इनायतनामा व पत्रे नजरबेगखान बक्षी व हाकीमबेगखांजी जमातदार मातबर व एक पत्र आह्मांस नजरबेगखान याहीं लिहिलें आहे , तें बजिनस पाठविलें आहे. याचा अर्थ पारसनवीस बोलावून अक्षरश: अन्वयें ध्यानास आणावा ह्मणजे समाधान होईल. स्वामीच्या नांवावर कुल अम्मलदार व मुत्सद्दी बहुत खुशवक्त आहेत, कीं ऐसे थोर सरदार या प्रसंगी असतां बहुत उत्तम आहे यावर जें विचारास येईल तें कीजे, आणि आह्मांस साउकारापासून मुक्त कीजे आपाजी व मलकोजी यांसी अजुरा रुपये ३२ व पहिले जोडा १ जासूद पाठविले होते, यांची बाकी रुपये १०, एकूण रुपये ४२ बेताळीस याचे पदरीं घालणें यानीं स्वामीच्या कार्यामध्यें श्रम बहुत केले आहेत यांसी वस्त्रें द्यावीं सत्वर मार्गस्त कीजे. पंधरा दिवसांचे वायदियानें आले आहेत. पथ दूर आहे तिकडे यावयास मनुष्य अनमान करीत आहेत वर्तमान तो इकडील तिकडील आलें पाहिजे अजुरा तो भारी पडतो. आज्ञा येईल तरी चार जोड जासूद ठेविले जातील सांप्रत आपाजी व मलकोजी सेवेसी आले आहेत, यास सही करावे आपाजी मनुष्य कामचंग मोंगलाईत वाकीफ आहे . याचा दरमहा मोकरा गौर करार कीजे. येथील सर्व अभिप्राय आपाजी सेवेसी निवेदन करितां कळों येईल.