Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

[ १७४ ]                                      ।। श्री भवानीशंकर ।।                                     ८ मे १७४८.                                                                                                                          

राजमान्य राजश्री भगवंतराऊ साहेबाचे सेवेसीः-
1अखडितप्रतापयशस्वी परउपकारपरायण सेवक गगाजी संकपाळ दडवत विनंति उपरि येथील क्षेम साहेबांचे कृपेकरून वैशाख वद्य ८ जाणून निजानंदवैभवलेखन अखंडित इच्छित असतो विशेष. साहेबाची आज्ञा घेऊन रुकसत होतेसमयी आपणापासून स्वामीनीं शपथ कार्याची घेतली याउपरि स्वार जालों, ते शहर औरंगाबादेस पावलों. दरबारमध्यें थैली पावती करावयासी तलास बहुत केला. हिंदवीपत्र कोणी नबाबास प्रविष्ट करीना. दोन अडीच महिने तलास केला. मग अगत्य काम केले पाहिजे ह्मणून पहिले राजश्री गोपाळराम व राजश्री नारो महादेव यासी स्नेह होता यापाशीं येऊन वृत्तांत निवेदन करतांच, याहीं उभयतां एक होऊन हिंदवीपत्र थैली काढोन पाहिली वृत्तात ध्यानास आणून, पारसीपत्र सिद्ध करोन, थैली दुरुस्त करून, मार्गेश्वरमासी नारो महादेव यांनीं नजरबेगखा बक्षी नबाबाचे फौजेचा याचे मार्फत गुजारणली. थैली पाहताच नजरबेगखानास आज्ञा केली कीं, कृष्णराउ खटावकर यांचे कोणीं आहेत कीं आणिक कोणी आहेत. कुलवर्तमान ध्यानास आणून अर्ज करणें. त्यावरून नजरबेगखानानीं वर्तमान आणविले मग राजश्री नारो महादेव स्वामीचे प्रतापास बहुत दिवस जाणतात. याहीं वर्तमान स्वामीन लिहून नजरबेगखानापाशीं दिधलें दुसरे दिवशीं फर्द नबाबास गुजराणिला. स्वामीचें वृत्त ऐकोन बहुत खुशाल जाले कीं, ते येत असले तरी उत्तम आहे, आपण त्यांचें सर्वस्वें चालऊन. इनायतनामा मुनसी यासी ताकीद करून मुखानें तयार करविला तितकियामधें नजरबेगखा वराडात खजाना आणावयासी पाठविला. आणि नबाबाचाही कुच होऊन ब-हाणपुरास लष्कर गेलें. राजश्री नारो महादेव यास समागमें घेऊन आपण ब-हाणपुरास गेलो. दरबार थोर. कुलराज्य हिंदुस्थान व दक्षण एकस्थली आलें आहे इनायतनामा हातास यावयासी बहुत दिवस लागले तलास करोन इनायतनामा करविला. तो नजरबेगखानही खजाना घेऊन लष्करास आलेत. नजरबेगखानास साहेबाचे नांवें आपण पत्र लिहून दिधलें होतें. त्यासी साह्य करोन याचे विद्यमानें दरबारचे मोहोर हातास आणून साध्यता त्या हातीं करवून इनायतनामा घेतला देतेवेळेस नजरबेगखानास नबाब बोलले की, तुह्मींहि लिहिणें कीं, जलदी फौजेचा सरंजाम, पन्नास हजार स्वार, पंचवीस हजार बरकदाज, सामानचागले आणणें सरजामही माकुल दिधला जाईल आह्मांस त्याचे उर्जित करणें अगत्य त्याचे वडलास आपण जाणतों सत्वर फौजेसहवर्तमा येऊन मुलाजमत करीत त्याचे मुदेमाफिक सर्व होऊन येईल भेटीउपरि खर्चाचीहि मदत केली जाईल ऐसी आज्ञा नजरबेगखानास जाली त्यावरून खान मजकूर याणीं सेवेसी पत्र लिहिले आहे त्यावरून निवेदन होणार साहेबापासून या मुलकांत आलिया शहरचा मोकदमा आणि महागाईही बहुत खर्चवेचास बहुत हैराण जालो पत्रीं लिहिता विस्तार होतो साहेबांचे नावावरी चौघे भले मनुष्याही संगत द्यावयाची ते दिधली खर्चवेचहि पुरविला. आणि मुत्सद्धीयाही थोर नांव ऐकोन मोठे तोंड पसरलें अनेक उपाय रचोन दरबारखर्च नजरबेगखान ५०० रुपये व मूसा ५०० रुपये, अर्जबेगी ५०० रुपये व पेशकार मुनसी व दरबारचे खिजमतगार, चोपदार वगैरे किरकोळ रुपये ५००, एकूण दोन हजार रुपये मोकरार करून इनायतनामा कठुराय कमलापंत साउकार याचे दुकानीं ठेविला आणि रोखा राजश्री नारो महादेव याणीं एका महिनियाचे वाइदियानें दिधला साउकाराकडोन मुत्सद्दीयांची निशा करविली मग आपण अवरंगाबादेस आलो येथें पैशाचा तलाश करावयाचा तो केला परंतु द्रव्य साध्य जालें नाहीं ह्मणून कासद अजुरदार अजुरा रुपये ३२ मोकरार करून १६ रोजांचे वायदियानें सेवेसी पाठविली आहे. येथे १० रुपये सध्यां कासदास दिधले. रुपये वीस साहेबीं कासदास देऊन रसीद लिहून घेऊन येथें या कासदाबरोबर रसीद पाठविली पाहिजे कीं, मुजरा घेतले पाहिजेत. दरबारखर्च लिहिलेप्रमाणे कासदाबरोबर कोणी इतबारी माणूस देऊन पाठविले पाहिजे कीं, तो आपले हातें ज्याचा करार त्यास देऊन इनायतनामा घेऊन सेवेसी पोंहचतो. साहेबीं रुकसतसमयीं आज्ञा केली होती कीं, दरबार खर्च काय लागेल आपण विनंति केली होती कीं, हे मोईन नाहीं. जे वेळेस जें ठरेल ते विनति केली जाईल त्यास सांप्रत इनायतनामा द्यावयासी दोन हजार रुपये लागले या वेगळा पोटखर्च राजश्री गोपाळराम व राजश्री नारो महादेव व राजश्री शिवराम शामराज तिघे भले मनुष्य यांहीं आपले पदरचा आह्मासकट खाऊन कार्य केले. नजरबेगखानाही गोपाळराम व शिवराम शामराज उभयतास सेवेसी पाठवावयाचें सां। आहे यांचे विद्यमाने जो विचार करणें तो करून सत्वर मुलाजमतीचा मनसुबा करणे ह्मणून सांगितलें आहे. त्यास, उभयतांचे नांवें आज्ञापत्रेहि पाठवावी, कीं गृहस्थ निर्भय चित्तें सेवेसी येऊन मनसुबा थाट करतील. फौजेचे तजविजेमध्येही असावयास अगत्यही आहे ऐसियामध्यें मनसुबा योजोन आला तीर आपले मुद्देमाफीक कार्य होऊन येईल. जागिरा व मदत खर्च चांगला घेतला जाईल. जमाव पडले साहेबी शपथ घेतली ह्मणून शरीरश्रम करोन कार्य केले आता सर्व अभिमान साहेबास आहे देखतपत्र ऐवज जासूद पत्र उत्तर पाठविले पाहिजे दिवस जातात कळले पाहिजे पांच महिने जाले की, शेख अहमद व सुभाना जासूद पत्र देऊन पाठविला पा। कीं नाहीं, संशय आहे मुलामाणसांची खबर काहीं नाही साहेब धणी आहेत परामृश करोन उत्तर पाठविलें पाहिजे. मा। हुसेन समागमें दिधला. त्याची स्थित पत्री लिहितां नये, काम खराब जालें होतें. परंतु तिघे गृहस्थ मातबर यांची भीड पडोन काम जालें. याची स्तुत लिहितां पत्र विस्तारेल. भेटीअंतीं सर्व निवेदन करूं हे विनंति.